खरं बोलणारा माणूस कुठेच फिट बसत नाही…..!
खरं बोलणारा माणूस कुठेच फिट बसत नाही…..! आजच्या काळात खरं बोलणं ही साधी गोष्ट उरलेली नाही. ते धाडसाचं, आणि अनेकदा मोठी किंमत मोजून मिळणारं मूल्य झालं आहे. कारण खरं बोलणारा माणूस कुठेच फिट बसत नाही. तो लोकांच्या सवयीच्या चौकटीत अडकत नाही, त्यांच्या सोयीच्या शांततेला प्रश्न विचारतो, आणि म्हणूनच नेहमी अस्वस्थता निर्माण करतो. घरात असा माणूस अनेकदा उद्धट वाटतो.तो ओरडत नाही, आवाज वाढवत नाही, पण त्याचे शब्द स्पष्ट आणि थेट असतात.तो गोड खोट्यांपेक्षा कडू सत्याला महत्त्व देतो.तो चुका लपवत नाही; तो आरसा दाखवतो… आणि आरसा पाहणं कुणालाच सोपं वाटत नाही. घरात बहुतेकदा प्रेमापेक्षा शांततेला अधिक महत्त्व दिलं जातं. सत्य बोललं की नात्यांमधील दडवलेल्या वेदना वर येतात,अधूरे प्रश्न उघड होतात.मग सत्य सांगणारा “चूक दाखवणारा” ठरतो,“प्रामाणिक” नसून “आगाऊ” ठरतो. शांत राहणं शहाणपण मानलं जातं,आणि खरं बोलणं गैरसमजाचं कारण बनतं. ऑफिसमध्ये तर असा माणूस आणखीच धोकादायक वाटतो.कारण तो चापलुसी करत नाही.तो माणसांबद्दल नाही, तर कामाबद्दल बोलतो.तो फायद्यांपेक्षा नीतीला महत्त्व देतो.तो अन्याय पाहून गप्प बसत नाही, ...