पोस्ट्स

मैत्री आणि पैशांचा गुंता: विश्वासाची खरी किंमत

इमेज
मैत्री आणि पैशांचा गुंता: विश्वासाची खरी किंमत आपल्या जीवनात काही क्षण असे येतात, जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीची खरी किंमत समजते. आपल्या आयुष्यातील मोलाची गोष्ट म्हणजे आपले मित्र, आपली कुटुंबं, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला विश्वास. हेच आपल्या आयुष्याचे खरे धन असते. पण, या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी आहे जी कधी कधी आपल्या मैत्रीला मोठा धक्का देऊ शकते – ती म्हणजे पैशांची देवाणघेवाण. पैसा घेताना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा – जेव्हा आपला मित्र आपल्याला पैशांची मदत करतो, तेव्हा त्याची केवळ एकच भावना असते – आपल्या परिस्थितीला सुधारण्याची. परंतु, त्याच वेळी, एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्या पैशांची योग्य वेळेत परतफेड करणे. कारण, जेव्हा आपण पैसे परत करत नाही, तेव्हा त्या मित्राच्या मनात एक शंका निर्माण होते – "आता मी त्यावर विश्वास ठेवावा का?" आपण जरी प्रेमळ आणि प्रामाणिक मित्र असलो तरी, पैशांची देवाणघेवाण कधी कधी आपल्या संबंधांना एक वेगळा वळण देऊ शकते. जर एखादा मित्र वाईट निघाला, तर त्याचा सर्व मित्रांवर प्रभाव पडतो. आपले त्याच्याशी संबंध तुटले, आण...

"जीवनदानाची किमया: एक छोटासा निर्णय, नवसंजीवनी निर्माण करणारा"

इमेज
"जीवनदानाची किमया: एक छोटासा निर्णय, नवसंजीवनी निर्माण करणारा" जीवन म्हणजे एक सततचा संघर्ष, आशा आणि नवी दिशा दाखवणारी प्रेरणा. कधी कधी जीवन अडचणींच्या सावटाखाली हरवून जाते, पण अशा वेळी, कोणी एक हात पुढे करतो, आणि तेच हात नवजीवनाची ज्योत उजळवतात. शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल येथे 20 जानेवारी रोजी आयोजित स्टेम सेल्स चर्चासत्र हे अशाच आशेच्या किरणासारखे होते, जे जीवनाच्या संघर्षातून मार्गदर्शन करतं. दात्री फाउंडेशन, जी भारतातील सर्वांत मोठी रक्त स्टेम सेल डोनर संस्था आहे, यांनी या चर्चासत्राचे नेतृत्व केले. ही संस्था वर्ल्ड मॅरो डोनर असोसिएशनची मान्यताप्राप्त सदस्य असून अनेकांचे जीवन वाचविण्याचे कार्य अत्यंत समर्पणाने करत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले, "तुमच्या एका सॅम्पलने एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. हे दान फक्त शरीराचे नाही, तर माणुसकीचे आहे." त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनाला एक वेगळंच उद्दीपन दिलं. दात्री फाउंडेशनचे गुजरात व्यवस्थापक श्री. ईश्...

स्वतःचा प्रयत्न!

इमेज
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग २०   * स्वतःचा प्रयत्न! प्रयत्न हा यशाचा पाया असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा त्याला स्वप्नांची उच्चतम उंची गाठण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या प्रवासात कधी अपयश येते, तर कधी वेळेचा कठोर कसोटीचाही सामना करावा लागतो. परंतु, प्रत्येक प्रयत्नामध्ये यश लपलेलं असतं; फक्त त्यासाठी संयम, सातत्य आणि विश्वास या गोष्टींची आवश्यकता असते. प्रयत्न करताना कधी कधी असे वाटते की, "हे माझ्या हातात नाही" किंवा "मी हरलो." पण खरे तर, तोच क्षण यशाचा आरंभ असतो. ज्या मुळांवरून झाड उगवायचं असतं, त्या मुळांना खोलवर रुजण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे, आपले प्रयत्न हे त्या मुळांसारखे असतात, जे जमिनीखाली दिसत नसले तरी भविष्यातील मजबूत पायाभूत रचना तयार करत असतात. जिवंत उदाहरण म्हणून एका शेतकऱ्याचा विचार करा. तो जेव्हा बी पेरतो, तेव्हा त्याला लगेचच फळे मिळत नाहीत. तो विश्वासाने पाणी घालतो, मातीची काळजी घेतो आणि सूर्यप्रकाशावर अवलंबून राहतो. एक विशिष्ट कालावधीनंतरच ते बी रुजतं आणि एक छोटं रोपटं तयार होतं. आपल्या जीवना...

गणेश उत्तम गुजर: शून्यातून विश्व निर्माण करणारा संघर्षशील प्रवास

इमेज
गणेश उत्तम गुजर: शून्यातून विश्व निर्माण करणारा संघर्षशील प्रवास दापोरी, तालुका एरंडोल येथील एक साधं, सर्वसामान्य कुटुंब. अशा कुटुंबात जन्मलेल्या गणेश उत्तम गुजर यांचा जीवनप्रवास खरंच प्रेरणादायक आहे. त्यांच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय होता, तर आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोल मजुरी करायची. घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं. याच कठीण परिस्थितीने गणेश यांना संघर्षाची आणि जिद्दीची शिकवण दिली. घरात सर्वात मोठा मुलगा म्हणून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच वेळी त्यांना समजलं की, "आता काहीतरी करायला पाहिजे." त्यांना इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. गणेश यांचे शालेय जीवन अत्यंत कठीण होतं. घरात पैशांची खूप कमतरता होती, पण त्यातही त्यांनी शिक्षण घेतलं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर ते शिक्षण पूर्ण केलं. लहानपणी घरातील परिस्थितीमुळे ते पाव विकायचे आणि मार्केटिंग करत असताना त्यांना जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता आल्या. हे शिकत शिकत त्यांनी नाशिक गाठलं. नाशिकमध्ये त्यांनी एका कंपनीत काम सुरू केलं, पण त्यांचं मन शांत बसू देत नव्हतं. त्यांना कायम विचार यायचे, ...

स्वतःच्या ध्येयासाठी संघर्ष करत राहा

इमेज
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग १९ * स्वतःच्या ध्येयासाठी संघर्ष करत राहा ! जीवन म्हणजे संघर्ष आणि आव्हानांनी भरलेली वाटचाल. प्रत्येक नवीन दिवस आपल्या समोर नवे प्रश्न, नवी आव्हानं उभी करतो. अशा कठीण क्षणी अनेकदा मनात विचार येतो – आपण हे सगळं झेलू शकतो का? पण अशा वेळी एक गोष्ट आपल्याला पुन्हा उभं करण्याची ताकद देते – ती म्हणजे आपलं ध्येय. ध्येय म्हणजे जीवनाचा आधारस्तंभ. त्याच्या प्रेरणेनं आपलं मनोबल कधीच खचत नाही. लहानपणापासूनच मी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत होता. शाळेत जाण्यासाठी पायी चालावं लागायचं; अभ्यासासाठी पुस्तकं, साधनं कमी पडायची. तरीही, स्वप्नं उराशी बाळगून मी धडपडत राहिलो. कधी कधी वाटायचं, “सगळं सोडून द्यावं.” पण माझ्या ध्येयाचा आवाज नेहमी म्हणायचा, “थांबू नकोस. पुढं चालत राहा. यश तुझी वाट पाहतंय.” प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे असतात. ते आपल्या ताकदीची परीक्षा घेतात. संयम, जिद्द आणि चिकाटी या गुणांना परखून पाहतात. मीसुद्धा अपयशाचा अनुभव घेतला. कधी मित्रांची चेष्टा, कधी नातेवाईकांचे टोमणे – अशा प...

संघर्षातून स्वप्नपूर्ती: संदीप पाटील यांची यशोगाथा

इमेज
संघर्षातून स्वप्नपूर्ती: संदीप पाटील यांची यशोगाथा एरंडोलसारख्या छोट्या तालुक्यातून सुरू झालेली एका तरुणाची संघर्षमय कहाणी आज अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे. ही कहाणी आहे संदीप दिलीप पाटील यांची, ज्यांनी कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. संदीप पाटील यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या जीवनाला मोठा धक्का बसला – वडिलांचं अकाली निधन. घरावर आर्थिक संकट ओढावलं, कुटुंबाची जबाबदारी वाढली, पण संदीप यांनी परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. शिक्षण हेच जीवन बदलण्याचं साधन आहे, या विश्वासाने त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. शिक्षणाचा खर्च स्वतः उचलण्यासाठी त्यांनी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात प्रिंटिंग क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली. छापखान्याचं तंत्रज्ञान, कागदावर छापणाऱ्या अक्षरांचं सौंदर्य याबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे. हीच आवड पुढे त्यांचं स्वप्न बनली. सुरुवातीला त्यांनी एका लहान छापखान्यात काम केलं, जिथे त्यांनी प्रिंटिंगच्या बारकाव्यांचं ज्ञान...

"मी पडीन,पण थांबणार नाही"

इमेज
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग १८ "मी पडीन,पण थांबणार नाही" जीवनाच्या प्रत्येक वळणावर अडचणी आणि संकटं समोर येतात. अनेक वेळा असं वाटतं की, आपण थांबावं, आपल्या प्रयत्नांना विराम द्यावा. अपयश, दुःख, आणि संघर्ष ह्यामुळे आपलं मन थकलं असतं. पण त्या अंधारात, आपल्या अंतःकरणात एक आवाज ऐकू येतो जो सांगतो, "मी पडीन, पण थांबणार नाही, कारण मी यशस्वी होणारच!" यशाची ओळख सहज मिळत नाही. यशाचा मार्ग संघर्ष, अपयश आणि नशिबाशी लढाईने भरलेला असतो. पण या सर्व गोष्टींच्यामागे एक अपार ताकद लपलेली असते. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण आपल्याला नव्या अनुभवांची शिकवण देऊन आपली क्षमता वाढवते. ह्या अनुभवांनीच आपली खरी ताकद निर्माण होते. पडणं म्हणजे पराभव नाही. पडणं म्हणजे एक शिकवण आहे, एक नव्या वळणाची सुरवात आहे. प्रत्येक अपयश आपल्या जीवनात काहीतरी नवीन शिकवते. त्या शिकवणीच्या आधारावरच आपण पुढे जात राहतो. जेव्हा आपण अंधारात चालत असतो, तेव्हा प्रकाशाचा शोध घेणारेच खरे विजयी होतात. संघर्ष करणं हेच खरे. कारण संघर्षाशिवाय यशाचा खरा आनंद कधीच अनुभवता येत नाही. जीवनाच्या कठीण क्षणांत, जेव्...

संघर्षातून यशाकडे: प्रभाकर कासार यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास"

इमेज
" संघर्षातून यशाकडे: प्रभाकर कासार यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास" प्रभाकर कासार हे आपल्या देशासाठी कार्य करणारे आणि भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नेणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने देशाचा सन्मान वाढवला आहे. पुण्यातील NCRA (आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था) अंतर्गत जगप्रसिद्ध GMRT प्रकल्पात टेक्निकल ऑफिसर म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे." २५ मे १९७१ रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आसनखेडा या छोट्या गावात प्रभाकर कासार यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण खडतर परिस्थितीत गेले. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आणि आईचा कासारी व्यवसाय कुटुंब चालवण्यासाठी पुरेसा नव्हता, पण मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी विशेष कष्ट घेतले. परिस्थिती हलाखीची असली तरी शिक्षणासाठी घरातील जिद्द कायम होती. प्रभाकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पुढे पाचोऱ्यातील श्री गो. से. हायस्कूलमध्ये त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाले. वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी जळगावच्या ITI संस्थेत फिटर ट्रेडचे शिक्ष...

शांत, संयमी आणि समाजासाठी झटणारे – ॲडव्होकेट प्रेमराज पाटील

इमेज
शांत, संयमी आणि समाजासाठी झटणारे – ॲडव्होकेट प्रेमराज पाटील ॲडव्होकेट प्रेमराज पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करायचा झाल्यास, ते साधेपणाचा आदर्श आणि माणुसकीचा जिवंत संदेश आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल काही शब्द लिहिणे, ही नक्कीच सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रेमराज पाटील यांचा स्वभाव शांत, संयमी आणि अत्यंत समंजस आहे. ते कधीही कुणावर रागावलेले किंवा कठोर शब्द वापरताना पाहायला मिळत नाहीत. ते प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवतात आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतात. त्यांच्या स्वभावातील ही सौम्यता आणि सहृदयता त्यांना सर्वांच्या मनामध्ये खास स्थान मिळवून देते. समाजातील गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांची तत्परता हा त्यांच्या जीवनाचा गाभा आहे. त्यांच्या दाराशी मदतीसाठी आलेल्या व्यक्तीला कधीही निराश होऊन परत जावे लागत नाही. गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम करतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना नवी दिशा आणि जगण्याची उमेद मिळते. प्रेमराज पाटील केवळ एक यशस्वी वकील नाहीत, त...

स्वतःचा आदर्श ठरवा !

इमेज
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग १७ * स्वतःचा आदर्श ठरवा ! स्वतःचा आदर्श ठरवा, कारण तुमच्या आदर्शातच इतरांना मार्गदर्शन मिळते आयुष्य म्हणजे संघर्ष आणि शिकण्याचा एक प्रवास. प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी वाटतं, "मी हे सगळं कशासाठी करतोय? माझं आयुष्य खरंच योग्य दिशेने चाललंय का?" अशा वेळी या प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कोणाला तरी आदर्श मानतो. आदर्श म्हणजे असा दिवा, जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. पण आदर्श म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण नव्हे. तो आपल्या आतच असतो. तो शोधायचा, घडवायचा, आणि आयुष्याला एका ठोस दिशेने न्यायचं असतं. स्वतःचा आदर्श ठरवणं म्हणजे आपल्या विचारांना, मूल्यांना आणि ध्येयांना ओळखणं. आपण जसं वागतो, जे निर्णय घेतो, तेच आपला आदर्श ठरवतात. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा आदर्श उभा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्व दिलं आणि समाजात मोठं परिवर्तन घडवलं. स्वामी विवेकानंदांनी आत्मबळावर भर देऊन तरुणांना प्रेरित केलं. त्यांच्या आदर्शांमुळे फक्त त्यांचं आयुष्य नव्हे, तर संपूर्ण समाजाचा विचार बदलला. पण हे आदर्श त्यांचे होते; आपण त्यांच्यापासू...

जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा यशस्वी प्रवास: अ‍ॅड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन

इमेज
जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा यशस्वी प्रवास: अ‍ॅड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन एरंडोल या छोट्याशा गावात एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या अ‍ॅड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन यांचा जीवन प्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांचे प्रतीक आहे. त्यांच्या वडिलांनी सुखदेव चौधरी यांच्या ऑइल मिलवर हमाली करून कुटुंबाचा चरितार्थ चालवला, तर आई कमलबाई यांनी घर सांभाळताना खूप कठीण प्रसंग झेलले. अशा परिस्थितीत वाढलेल्या ज्ञानेश्वर यांनी आपल्या शिक्षणासाठी आणि आयुष्य घडवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण रा .ही. जाजू प्राथमिक विद्यालयात झाले, तर माध्यमिक शिक्षण रामनाथ तिलकचंद काबरे विद्यालयात पूर्ण झाले. त्यांच्या बालपणात गरिबी परिस्थितीने अक्षरशः कहर केला होता. घर काड्यांच्या भिंती आणि पत्र्याचे छप्पर असलेले, घरात विजेचा उजेडाचा पत्ताच नव्हता. रॉकेलच्या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या या मुलाला वह्या-पुस्तके खरेदीसाठी ही पैसे नव्हते. पण शिक्षण घेण्याची जिद्द त्यांच्या मनात घट्ट होती. आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनेक कामे केली. प्रशांत ओपन थेटर जवळील एकवीरा हॉटेलमध्ये ...

दीपकभाऊ सोनवणे: समाजसेवेचा दीप उजळवणारे नेतृत्व

इमेज
दीपकभाऊ सोनवणे: समाजसेवेचा दीप उजळवणारे नेतृत्व धरणगाव तालुक्याच्या भूमीत दीपकभाऊ सोनवणे हे नाव आत्मीयतेने घेतले जाते. साधेपणा आणि अथक समाजसेवेने त्यांनी आपल्या परिसरातील लोकांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या योगदानामुळे जनसामान्यांमध्ये त्यांनी आपले स्थान कायमचे निर्माण केले आहे. दीपकभाऊंच्या जीवनाचा प्रवास संघर्षमय होता. सामान्य कुटुंबातून आलेल्या दीपकभाऊंनी कधीही हार न मानता आपल्या स्वप्नांसाठी अथक प्रयत्न केले. त्यांचा संघर्ष केवळ स्वतःसाठी नव्हता, तर तो समाजाच्या प्रगतीसाठी होता. गोरगरीबांचे प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांचे हक्क जपणे आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. सभापतीपदी असताना त्यांनी तालुक्यातील विकासाला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्यसेवा आणि रस्ते या मूलभूत गरजांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. लोकांच्या समस्या समजून त्या सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. समाजाच्या सर्व स्तरांशी संवाद साधण्याची त्यांची शैली आणि लोकांना सोबत घेऊन चालण्य...

आरोग्यसेवेचा आरसा: शास्त्री इन्स्टिट्यूटची प्रेरणादायी भेट

इमेज
आरोग्यसेवेचा आरसा: शास्त्री इन्स्टिट्यूटची प्रेरणादायी भेट शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यात असतो. याच उद्देशाने शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ मधील बी. फार्मसी व डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या शैक्षणिक भेटीत त्यांनी एरंडोलमधील ग्रामीण रुग्णालय, औषध वितरण केंद्र, आणि पॅथोलॉजी लॅबोरेटरीला भेट देऊन आरोग्यसेवेच्या विविध अंगांचा अभ्यास केला. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेच्या विविध पैलूंशी प्रत्यक्ष परिचित करून देणे आणि केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता समाजाच्या आरोग्यविषयक गरजांची जाणीव करणे हा होता. ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी केले. त्यांनी बाह्य रुग्ण विभाग, आंतरंग विभाग, औषध वितरण विभाग, आणि शस्त्रक्रिया विभाग यांची सविस्तर माहिती दिली. औषधांचे वितरण, रुग्णांशी संवाद साधण्याची पद्धत, तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबद्दल त्यांनी विद्यार्थ्य...

"शाहीर शिवाजीराव पाटील: संघर्षाची गोडी आणि समाजाच्या उत्क्रांतीची ध्वनी"

इमेज
"शाहीर शिवाजीराव पाटील: संघर्षाची गोडी आणि समाजाच्या उत्क्रांतीची ध्वनी" समाजात विविध प्रकारची माणसे आढळतात. काही वडिलोपार्जित संपत्तीच्या आधारावर यश मिळवतात, काहींच्या आयुष्यात वरदहस्ताने प्रगती होते, तर काही माणसे आपल्या मेहनतीने आणि स्वकर्तृत्वावर पुढे जातात. यातील तिसऱ्या प्रकारच्या माणसांचे जीवन नेहमीच वेगळं आणि विशेष असतं. या माणसांच्या जीवनात अनेक संघर्ष, अडचणी आणि कठीण प्रसंग येतात, मात्र ते या सर्वांना जिद्द आणि इच्छाशक्तीच्या आधारावर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचतात. अशाच एका अद्वितीय व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे खान्देशभूषण शाहीर शिवाजीराव पाटील. शिवाजीराव पाटील यांचा जन्म १ जानेवारी १९५५ रोजी खान्देशातील नगरदेवळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. घराची परिस्थिती अत्यंत कठीण होती. शालेय जीवनाच्या प्रारंभापासूनच घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली होती. लहानपणापासूनच शेतमजुरी करत असताना त्यांना संगीताची गोडी लागली. शेतात काम करत असताना त्यांनी ओव्या, भजनं आणि लोकगीते ऐकली आणि हळूहळू गोड आवाजात गाणी गायची सुरुवात केली. त्यांचा आवा...

स्वकष्टाची यशोगाथा: घनश्याम दगडूशेठ सोनार यांचा प्रेरणादायी प्रवास

इमेज
स्वकष्टाची यशोगाथा: घनश्याम दगडूशेठ सोनार यांचा प्रेरणादायी प्रवास धरणगाव तालुक्यातील सोनवद या लहानशा गावात जन्मलेले घनश्याम दगडूशेठ सोनार हे कष्टाला प्रतिष्ठा देणारे आणि साधेपणात सामर्थ्य शोधणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. साध्या कुटुंबात जन्मलेल्या घनश्याम यांचे बालपण संघर्षमय होते. त्यांच्या वडिलांनी टेलरिंग व्यवसायातून कुटुंब चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती खूपच कठीण होती. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले. त्यांच्या आयुष्याने त्यांना मेहनतीचे महत्त्व शिकवले. जिद्द आणि प्रामाणिक कष्ट हेच यशस्वी होण्याचे गमक आहे, याचा त्यांनी अनुभव घेतला. शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या कामांतून आर्थिक गरज भागवली. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाण्याचा दृढ निश्चय त्यांनी कायम ठेवला. आज "बागुल ज्वेलर्स" हे नाव त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. घनश्याम यांनी हा व्यवसाय उभारून केवळ सोन्या-चांदीचा व्यापार केला नाही, तर विश्वास आणि गुणवत्तेचा एक नवा मापदंड ठरवला. धरणगाव तालुक्यात "बागुल ज्वेलर्स" हे नाव गुणवत्तेच्या प्रतीक म्हणून ओळ...