ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही !
ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही ! ध्येय ठरवले, पावलं पुढे टाकली आणि त्या वाटचालीला समर्पितपणे ध्यास दिला की यशाचा दरवाजा नकळत उघडतो. हेच जणू काही चोपडा येथील आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अनुभवायला मिळालं. दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या सोहळ्यात खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा मंत्र दिला — “ध्यासाशिवाय साधना फलद्रूप होत नाही आणि साधनेशिवाय अध्ययन व अध्यापन अशक्य आहे.” या समारंभात व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, डॉ.प्रा. समाधान पाटील आणि अकॅडमीचे प्राचार्य पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. आंधळे यांनी आपल्या भाषणात भाषेच्या सामाजिक व सांस्कृतिक परिमाणांची सखोल मांडणी केली. “भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती सौंदर्य आणि शक्ती यांचं मिलन आहे. ती जपली गेली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि तिचा अभ्यास होणे आवश्यक आहे,” असे ते उद्गारले. त्यांच्या भाषणाने सभागृह भारावून गेले. जुन्या-नव्या कविता, त्यातील संदर्भ, संस्कारांची बीजं यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात श...