कुणाच्या ताटात ढवळाढवळ करू नये….!
कुणाच्या ताटात ढवळाढवळ करू नये….! कुणाच्या ताटात जाऊन ढवळाढवळ करू नये, कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे त्याचं स्वतःचं ताट असतं.त्या ताटात त्याने आयुष्यभर गोळा केलेले अनुभव असतात. कष्टांनी मिळवलेले घास असतात.कधी समाधानाची भाजी असते,तर कधी अपयशाची कडू चवही असते. भाकर्या, मीठ-भाजी, गोड-कडू क्षण हे सगळं त्याने स्वतःच्या श्रमांनी, चुका करून, पडत-उठत कमावलेलं असतं. अशा ताटात परवानगी शिवाय हात घालणं म्हणजे फक्त हस्तक्षेप नव्हे,तर त्या माणसाच्या आत्मसन्मानावर, स्वाभिमानावर दिलेली ठेच असते.कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं,आणि प्रत्येकाच्या संघर्षाची खोली त्यालाच ठाऊक असते. सहकार्य म्हणजे समोरच्याचं ताट हिसकावून घेणं नाही. सहकार्य म्हणजे त्याला जेवू न देता आपण पुढे निघून जाणंही नाही.खरं सहकार्य म्हणजे तो घास नीट पकडू शकत नसेल, तर त्याचा हात घट्ट पकडणं.तो पडत असेल, तर त्याला सावरण्यासाठी खांद्यावर हात ठेवणं. तो हरवला असेल, तर वाट दाखवणं.वाट चोरणं नव्हे. आजच्या जगात एखाद्याला शिकायची संधी न देता त्याच्या चुका मोठ्या करून दाखवणं फार सोपं झालं आहे.चार शब्द, दोन आरोप आणि एक शिक्का...