मातीशी नाते जपणाऱ्या सेवेचा गौरवसोहळा....!
मातीशी नाते जपणाऱ्या सेवेचा गौरवसोहळा....! शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती संपूर्ण जीवनपद्धती आहे. या मातीत घाम गाळणारा शेतकरी म्हणजे बळीराजा… आणि त्या बळीराजाच्या कष्टांना दिशा देणारे, त्याच्या प्रत्येक संकटात सावलीसारखे उभे राहणारे हात म्हणजे कृषी सेवेतील निष्ठावान अधिकारी व कर्मचारी. त्यांच्या समर्पित सेवेमुळेच समाजसेवेचा खरा अर्थ अधोरेखित होतो. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित खान्देश कृषी संस्कृती व पशु प्रदर्शन हा केवळ एक महोत्सव नव्हता, तर तो शेतकरी, शेती आणि त्यांच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. या महोत्सवात धरणगाव तालुक्यात तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आत्मा यंत्रणेमार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM – आत्मा) दिपक पुष्पा एकनाथ नागपुरे यांचा सन्मान करण्यात आला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. दिपक नागपुरे यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम ...