पोस्ट्स

गणवेशातून घरापर्यंत साध्या कुटुंबातील देशभक्ताचे जीवन....!

इमेज
गणवेशातून घरापर्यंत साध्या कुटुंबातील देशभक्ताचे जीवन....! साकरे, तालुका धरणगाव या साध्या, शांत गावात जन्मलेले ज्ञानेश्वर साहेबराव बाविस्कर (पाटील) हे नाव आज गावासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं आहे. घरची परिस्थिती अत्यंत साधी, साधनसंपत्ती मर्यादित, पण मनात स्वप्नं मोठी. वडिलांची दूध विकास फेडरेशनमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी असली तरी घर चालवताना अनेकदा आर्थिक तुटवडा भासत असे. या सर्व अडचणींमध्ये ही ज्ञानेश्वर यांच्या डोळ्यातील देशभक्तीची ज्योत कधीच मिटली नाही. बालपणापासूनच त्यांना एकच ध्यास होता देशसेवा. गावातील सैनिकांच्या शौर्यकथा ऐकताना त्यांचे डोळे चमकायचे. गणवेशात सैनिक पाहिले की मनात फक्त एक विचार येई."एक दिवस मीही हा गणवेश अभिमानाने परिधान करीन." वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी हा ध्यास प्रत्यक्षात आणला. भारतीय सैन्यात भरती होऊन शिपाई पदावरून कारकिर्दीची सुरुवात केली. कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवन, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ त्याग या सर्वाने त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजस्वी बनवले. २४ वर्षांचा प्रामाणिक सेवा प्रवास…असंख्य आठवणी, कठीण परिस्थिती, विविध पोस्टिंग्स  परंतु...

एरंडोलमध्ये महाबीज पीक प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांचा वाढवला आत्मविश्वास...!

इमेज
एरंडोलमध्ये महाबीज पीक प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांचा वाढवला आत्मविश्वास...! एरंडोलच्या सुपीक मातीत पुन्हा एकदा आशेची हिरवी पालवी डोलू लागली होती. सकाळच्या मंद वाऱ्यात गव्हाच्या कणसांची सळसळ आणि हरभऱ्याच्या टवटवीत पानांची झुळूक जणू शेतकऱ्यांच्या कष्टांना प्रणाम करत होती. त्या कष्टांत घाम होता, संघर्ष होता; पण त्याचबरोबर होता अढळ विश्वास “शेती टिकली तर आपण टिकू.” एरंडोल येथील शेतकरी शेतीनिष्ठ, मेहनती आणि आधुनिक पद्धतीने शेती करणारे आहेत. परंपरेची माती हातात घेऊन त्यांनी विज्ञानाची कास धरली आहे. पहाटेच्या दवात भिजलेले पाय आणि संध्याकाळच्या थकव्यावर मात करणारे हृदय हीच त्यांची ओळख. त्यांच्या या जिद्दीला बळ देण्यासाठी महाबीजतर्फे आयोजित पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाने एरंडोलच्या शिवारात नव्या आत्मविश्वासाची पेरणी केली. शरद किसन पाटील यांच्या शेतावर महाबीज गहू फुले सात्विक (NIAW-3170) या वाणाचे, तर आकाश रामचंद्र पाटील यांच्या शेतावर फुले विक्रम या हरभरा वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. हिरव्यागार शेतात उभ्या पिकांकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांत समाधानाची चमक होती. भरदार कणसं हातात...

स्वार्थी आणि निस्वार्थतेची खरी किंमत...!

इमेज
स्वार्थी आणि निस्वार्थतेची खरी किंमत...! आयुष्यात अनेक माणसं येतात. काही लोक आपल्या आयुष्यात निस्वार्थ प्रेमाने भरभरून देतात, तर काही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी येतात.स्वार्थी माणसं. आणि हे स्वार्थी माणसं येणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्याशिवाय आपण खऱ्या निस्वार्थ माणसांची खरी किंमत कधीच जाणून घेऊ शकत नाही. कल्पना करा, भिंतीवर एक सुंदर फोटो लावलेला आहे. फोटोची सुंदरता सर्वांना दिसते, त्याचे रंग, छटा आणि रूप पाहून सर्वजण कौतुक करतात. पण तो फोटो भिंतीवर टिकवणारा खिळा? त्याचा भार, त्याचे कष्ट, त्याचे समर्पण याचा कुणालाच आभास नसतो.आयुष्यही तसंच आहे. आपले प्रयत्न, आपली मेहनत, आपला वेळ हे सर्व अनेकदा दिसत नाही; फक्त परिणाम दिसतो. आणि या परिणामामागचा संघर्ष, झोप न सोडणारी रात्र, अपार समर्पण हे क्वचितच कुणालाच जाणवतं. कधीकधी केलेल्या कामाचे श्रेय मिळत नाही. अनेकदा आपले प्रयत्न अनदेखे राहतात, आणि हे आपल्याला दुखावतात. पण या अनुभवांमुळेच आपण खंबीर होतो, शिस्तीत आणि संयमात शिकतो. जेव्हा एखादा निस्वार्थ माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो, आपल्यासाठी काही करतो, तेव्हा आपल्याला कळते की खरी मा...

कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....!

इमेज
कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....! “कोणाचं वाईट करून आपलं भलं होईल हा विचार कधीच करू नका; कारण निसर्ग नेहमी व्याजासह परत करतो… चांगुलपणाची बीजे पेरा, आयुष्यात सुख नक्कीच उगवेल. कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.” ही वचने केवळ उपदेश नसून जीवनाचा गूढ आणि गाभा उलगडणारा शाश्वत नियम आहेत. मानवी जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा तात्पुरत्या लाभाच्या मोहात अडकतो. यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या धावपळीत कधी नकळत इतरांच्या भावनांना ठेच पोहोचवतो, कुणाला कमी लेखतो, तर कुणाच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. त्या क्षणी आपल्याला वाटते की आपण जिंकलो; परंतु हे आपण विसरतो की प्रत्येक कृतीची सावली आपल्यामागेच असते. निसर्गाच्या लेखावहीत प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती नोंदली जाते. त्या वहीत पुसण्याची सोय नसते; तेथे बदलाची शाई नसते. आज आपण जे पेरतो, तेच उद्या आपल्या आयुष्यात उगवते.फरक फक्त काळाचा असतो. शेतकरी जसा बी पेरताना जागरूक असतो, तसाच विवेक आपल्या कृतीत असणे आवश्यक आहे. तो कधीच काटेरी झाडाचे बी पेरून गोड फळांची अपेक्षा करत नाही. मग आपण मत्सर, द्वेष, कपट आणि फसवणूक यांची बीज...

दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी...!

इमेज
दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी...! दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या लोकांनी आधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहावे. दुसऱ्याच्या आयुष्यातील चुका शोधताना आपले हात किती मळलेले आहेत, याची त्यांना अनेकदा जाणीव नसते. आजच्या जगात दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, अफवा पसरवणे, किंवा त्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणे इतके सोपे झाले आहे.  एक चुकीचा शब्द, एक तिरकस टिपण किंवा दुर्भावनाशील नजर दुसऱ्याच्या जीवनात खोल जखम करू शकते, पण आपण स्वतःच्या मनातील कटूता, द्वेष आणि मत्सर याची जाणीव ठेवतो का? बहुतेक वेळा आपण हे विसरतो. चारित्र्य म्हणजे फक्त बाह्य वर्तन नव्हे; ते मनाची शुद्धता, विचारांची प्रामाणिकता आणि कृतीची सातत्यता आहे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात दोष शोधतो, तेव्हा आपण स्वतःच्या कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याच्या चुका मोजण्यात रमल्यावर, स्वतःच्या चुका मान्य करण्याचे धैर्य आपण गमावतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीची शांतता ही कमजोरी नव्हे, तर संस्कृती असते. तो प्रत्युत्तर देत नाही म्हणून दोषी ठरत नाही. उलट, न बोलता सहन करणाऱ्या मनाची वेदना शब्दांपेक्षा अधिक तीव्र ...

दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....!

इमेज
दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....! दुसऱ्यांच्या पराभवाची वाट लावण्यात काही लोकांना एक विचित्र समाधान मिळते. जणू दुसऱ्याला खाली खेचले की आपण आपोआप उंचावतो, अशी त्यांची समजूत असते. परंतु जीवनाचा एक साधा, शांत आणि अटळ नियम आहे.दुसऱ्याची वाट लावताना आपण नकळत स्वतःचीच वाट लावत असतो. दुसऱ्यांच्या अपयशावर टाळ्या वाजवणारे हात कधीतरी स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू पुसताना थरथरतात. कारण नियती अत्यंत शांतपणे आपला हिशेब ठेवत असते. आपण कोणाच्या पायात अडथळे टाकतो, कोणाच्या स्वप्नांवर निर्दयपणे पाय देतो, कोणाच्या विश्वासाला तडा देतो. याची प्रत्येक नोंद वेळ आपल्या वहीत करत असते. त्या नोंदी कधी पुसल्या जात नाहीत; त्या योग्य वेळी परतफेडीच्या रूपाने समोर येतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरवणाऱ्याला क्षणभर वाटते.“मी जिंकलो!” परंतु तो हे विसरतो की अंधार पसरवण्यासाठी आधी स्वतःच्या मनात अंधार साठवावा लागतो. आणि ज्या मनात अंधार साचतो, तेथे शांतता, समाधान आणि आनंद हळूहळू नष्ट होऊ लागतात. बाहेरून विजयाचे हास्य असते, पण अंतर्मनात पराभवाची पोकळी दाटलेली असते. कुणाच्या अपयशाची खिल्ली उडवताना आपण...

संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार

इमेज
संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार                   ग्रामीण भागातील पत्रकारिता ही शहरातील पत्रकारितेपेक्षा अधिक आव्हानात्मक आणि थेट लोकांशी निगडित असते.एका आदर्श ग्रामीण पत्रकाराकडे केवळ लेखणीचे कौशल्य असून चालत नाही, तर त्याला सामाजिक भान आणि ध्येयवाद असणेही तितकेच महत्त्वाचे असते.जे टाकरखेडा संभू,ता. भातकुली,जि.अमरावतीचे धडाडीचे पत्रकार संतोष शेंडे यांच्याकडे आहे.        ​ग्रामीण भागातील आदर्श पत्रकाराला स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असली पाहिजे . ग्रामीण पत्रकाराला आपल्या परिसरातील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते.शेती, पाणीप्रश्न,आरोग्य सेवा आणि स्थानिक प्रशासकीय त्रुटी यांवर त्याची पकड असणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टी पत्रकार संतोष शेंडे जवळ असल्यामुळेच ते आज पत्रकारितेच्या क्षेत्रात  नावारुपास आलेले आहेत.       ​तटस्थता आणि निर्भीडपणा ग्रामीण पत्रकाराच्या अंगी असणे आवश्यक असते.​ग्रामीण भागात अनेकदा राजकीय दबाव किंवा गटबाजी असते.अशा वेळी कोणत्याही पक्...

पद नसले तरी स्वाभिमान असू द्या....!

इमेज
पद नसले तरी स्वाभिमान असू द्या....! “तुमच्या नावापुढे पद नसलं तरी चालेल; पण तुमचं मस्तक कोणासमोरही झुकलेलं नसावं.हीच खरी राजसत्ता आहे.” हे वाक्य केवळ शब्दांचा अलंकार नाही, तर ते आयुष्याचा गाभा सांगणारं गहन तत्त्वज्ञान आहे. कारण मनुष्य आयुष्यभर पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावत राहतो; परंतु या सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. आज आहेत, उद्या नसतील. काळाच्या ओघात वैभव क्षीण होतं, पदं बदलतात, सत्तेची आसनं रिकामी होतात; पण स्वाभिमान मात्र माणसाच्या अस्तित्वाचा पाया असतो. तो ढासळला, तर सर्व काही असूनही मनुष्य आतून रिकामा होतो. राजा होण्यासाठी सिंहासन लागतं, मुकुट लागतो, दिमाखदार दरबार लागतो.असं आपण मानतो. परंतु खरा राजा तोच असतो,ज्याच्या विचारांत प्रामाणिकपणा असतो, कृतीत सचोटी असते आणि डोळ्यांत भीती ऐवजी आत्मविश्वास झळकत असतो. राजेशाही वेशभूषा नसली तरी चालते; पण स्वभावात राजसता असली पाहिजे. समाजात अनेक व्यक्ती अशा असतात की त्यांच्या नावापुढे कोणतंही मोठं पद नसतं; तरीही त्या उंच भासतात. कारण त्यांनी कधीच स्वतःचा स्वाभिमान विकला नाही. परिस्थिती कठीण असो, संकटं डोईजड अस...

चारित्र्याची उंची आणि आरोपांची नीचता...!

इमेज
चारित्र्याची उंची आणि आरोपांची नीचता...! समाजात काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचं आयुष्य एखाद्या स्वच्छ झऱ्यासारखं निर्मळ, पारदर्शक आणि पवित्र असतं. त्यांचा स्वभाव सोज्वळ, वर्तन शिस्तबद्ध आणि विचार उदात्त असतात. त्यांच्या सहवासाने मन प्रसन्न होतं, कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकतेचा सुगंध आणि सत्यतेचं तेज दडलेलं असतं. त्या कोणाचंही वाईट चिंतत नाहीत, कोणाच्या मार्गात अडथळे आणत नाहीत; उलट इतरांच्या जीवनात प्रकाश फुलवण्याचं कार्य करत असतात. परंतु नियतीची एक वेदनादायी विडंबना अशी की, याच चारित्र्यसंपन्न व्यक्तींवर अनेकदा चरित्रहीनतेचे शिंतोडे उडवले जातात. त्यांच्या शुद्ध आचरणावर संशयाची सावली टाकली जाते. हे शिंतोडे केवळ शब्दांचे नसतात; ते मनाला जखम करणारे, आत्म्याला टोचणारे असतात. एखाद्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे त्याच्या अस्तित्वालाच हादरा देणं होय. याला नेमकं काय म्हणावं? ही केवळ चिखलफेक नाही.ही मत्सराची कडवट प्रतिक्रिया आहे.ही मानसिक दिवाळखोरी आहे. ही दुष्ट प्रवृत्तीची विकृत आनंदलालसा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने, निष्ठेने आणि सत्य...

शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल लोकशाही, शिक्षण आणि संस्कारांचा मंगल संगम....!

इमेज
शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल लोकशाही, शिक्षण आणि संस्कारांचा मंगल संगम....! एरंडोल शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात अभिमानाने नोंदवला जाईल असा एक सोहळा शास्त्री फार्मसी महाविद्यालयात अनुभवायला मिळाला. शिवजन्मोत्सवाच्या पावन औचित्याने आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा नागरी सत्कार हा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नव्हता, तर तो लोकशाहीवरील विश्वास, शिक्षणावरील निष्ठा आणि समाजकारणाची जाणीव यांचा हृदयस्पर्शी उत्सव होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोलदादा पाटील यांची उपस्थिती सोहळ्याला विशेष उंची देणारी ठरली. एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष सौ. .सुनीता माळी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. हा सत्कार म्हणजे जनतेच्या विश्वासाचा सन्मान होता. सत्कारमूर्तींमध्ये गटनेते प्रा. मनोज पाटील, जिजाबाई पाटील, अनिल महाजन, पठाण दलशेख, कल्पना पाटील, आरती महाजन, सय्यद जाफर, छायाबाई दाभाडे, भारती गुजर, सय्यद न...

जिंकलो तरी इतिहास हरलो तरी इतिहास....!

इमेज
जिंकलो तरी इतिहास हरलो तरी इतिहास....! स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा आत्मसन्मान ही माणसाच्या आयुष्याची खरी ओळख असते.माणूस किती श्रीमंत आहे, किती यशस्वी आहे, किती लोक त्याच्या भोवती आहेत… यापेक्षा तो स्वतःच्या नजरेत किती उंच आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण जग आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ओळखतं; पण आपण स्वतःला आपल्या स्वाभिमानाने ओळखतो. स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही.स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव.आत्मसन्मान म्हणजे स्वतःवर ठेवलेला विश्वास. जीवनाच्या वाटेवर चालताना अनेक अडचणी येतात. कधी परिस्थिती आपल्याला गुडघ्यावर आणते, कधी माणसं शब्दांनी जखमा करतात, कधी अपयश मनाचा कणा मोडून टाकतं. पण त्या क्षणी जर आपण स्वतःला विसरलो, स्वतःचाच आदर करायला सोडलं. तर खरी हार तिथेच होते. जिद्दीने उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नाही. जिद्दीने उभं राहणं म्हणजे पडून ही पुन्हा उभं राहण्याची तयारी ठेवणं.जगातील कुठलीही अडचण तुम्हाला हरवू शकत नाही,जो पर्यंत तुम्ही स्वतःला हरू देत नाही. आयुष्यात स्वतःला कधीही "उध्वस्त" होऊ देऊ नका. कारण जग खूप व्यावहारिक आहे.ढासळलेल्या घराच्य...

बोगस नोंदणींच्या सावलीत हरवलेला कष्टकरी...!

इमेज
बोगस नोंदणींच्या सावलीत हरवलेला कष्टकरी...! “खरंच सर्वच लोक बांधकाम कामगार आहेत का?” एका घामाच्या थेंबाचा निःशब्द आक्रोश सकाळचे पाच वाजलेले असतात. शहर अजून अर्धवट झोपेत असतं. रस्त्यांवर शांतता असते, दिव्यांचा पिवळसर उजेड अजूनही लुकलुकत असतो. पण एका चाळीत, एका छोट्याशा झोपडीत दिवस उगवलेला असतो. चुलीवर चहा उकळत असतो. एका आईने डब्यात कोरडी भाकरी आणि थोडी भाजी ठेवलेली असते. एका बापाने आपल्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवलेला असतो.त्या स्पर्शात प्रेम असतं, जबाबदारी असते, आणि एक न बोललेली चिंता असते.आणि तो निघतो…बांधकामाच्या साईटकडे. हातात फावडा. खांद्यावर कर्ज. मनात लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं. डोक्यावर जुनं हेल्मेट. आणि पायात जड चपला, ज्यांनी कित्येक मैल उन्हात चाललेलं असतं. तो उंच इमारती उभ्या करतो.तो शहराला आकार देतो. तो काँक्रीटच्या ढिगाऱ्याला स्वप्नांची वास्तू बनवतो. विटा रचताना त्याचे हात रक्ताळतात. सिमेंट मिसळताना धूळ फुफ्फुसात शिरते. लोखंडी सळया उचलताना स्नायू ताणले जातात. उन्हात भाजून अंग काळवंडतं, पावसात भिजून अंग थरथरतं. तरीही तो काम थांबवत नाही. कारण त्याच्यासाठी हा फ...

नोटांच्या आवाजात हरवलेलं अंतरात्मा....!

इमेज
नोटांच्या आवाजात हरवलेलं अंतरात्मा....! लाचेच्या पैशावर चहा पिणारा,आणि इमानाची भाषणं मोठ्या आवाजात देणारा…हा केवळ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव नाही, तर आपल्या समाजाच्या वेदनेचं प्रतिबिंब आहे. लाच म्हणजे फक्त पैशांची देवाणघेवाण नव्हे; ती माणसाच्या अंतरात्म्याची विक्री असते. जेव्हा एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदारीच्या जागी बसलेला कुणीही व्यक्ती आपल्या पदाचा वापर लोकांच्या भल्यासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करतो, तेव्हा तो फक्त नियम तोडत नाही.तो विश्वास तोडतो. आणि विश्वास तुटला की नाती तुटतात, समाज तुटतो. हातात नोटा असतात, पण त्या नोटांपेक्षा जास्त जड असतो तो निर्लज्जपणाचा भार. डोळ्यांत लाज नसते, चेहऱ्यावर बनावट प्रामाणिकपणाचा मुखवटा असतो. शब्द मात्र मोठे नैतिकतेची व्याख्यानं, प्रामाणिकपणाची उदाहरणं. पण आतून मात्र हव्यासाची आग धगधगत असते. पोटासाठी घेतलं असतं तर कदाचित आपण क्षमा केली असती. कारण गरिबी कधी कधी माणसाला विवश करते. उपाशी पोटाने विचार करण्याची ताकदही कमी होते. पण हव्यासासाठी घेतलेली लाच ही विवशता नसते.ती जाणूनबुजून केलेली चूक असते. जास्त पैशासाठी, जास्त सुखासाठ...

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार शिवजयंती उत्सवात सन्मानाचा सुवर्णक्षण...!

इमेज
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार शिवजयंती उत्सवात सन्मानाचा सुवर्णक्षण...! दि. १९.०२.२०२६ हा दिवस एरंडोलकरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा ठरला. शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. सभागृहात दुमदुमणारा “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष, फुलांच्या सुगंधाने भारलेले वातावरण आणि उपस्थितांच्या डोळ्यांत दाटलेला अभिमान या सर्वांनी त्या क्षणाला एक पवित्र आणि भावस्पर्शी रूप दिले. महाराजांच्या प्रतिमेस अर्पण केलेला पुष्पहार हा केवळ एक विधी नव्हता, तर तो स्वराज्याच्या आदर्शांना वंदन करण्याचा एक मनापासूनचा प्रयत्न होता. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी महाराजांच्या कार्याची आठवण करताना त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठतेचा संकल्प मनाशी दृढ केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या स्वाभिमानाची जाज्वल्य गाथा आणि हाच संदेश त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजला. तसेच दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह...

मीच श्रेष्ठ अहंकारातून नम्रतेकडे जाणारा प्रवास...!

इमेज
मीच श्रेष्ठ अहंकारातून नम्रतेकडे जाणारा प्रवास...! आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत आहे. या धावपळीत नकळत एक विचार मनात घर करून बसतो. “माझ्यासारखा मीच!” आपण जे करतो, ज्या पद्धतीने विचार करतो, जसे जगतो… तसे कोणीच नाही, असे आपल्याला वाटू लागते. स्वतःवर विश्वास असणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे; परंतु हा विश्वास जेव्हा अहंकारात परिवर्तित होतो, तेव्हा तो आपल्या डोळ्यांवर पडदा टाकतो. या जगात कोणीही पूर्ण नाही आणि कोणीही अंतिम नाही.इतिहास साक्षी आहे.असंख्य महान व्यक्ती या भूमीवर होऊन गेल्या. त्यांनी पर्वत हलवले, समुद्र पार केले, समाजाला नवी दिशा दिली, विचारांची क्रांती घडवली. तरीही काळाच्या प्रवाहाने त्यांनाही मागे टाकले. कारण प्रत्येक शिखराच्या पुढे आणखी एक शिखर असतेच. प्रत्येकाला “शेरास सव्वाशेर” असतो. ही केवळ म्हण नाही, तर जीवनाचे शाश्वत सत्य आहे. आपण कितीही यशस्वी झालो, कितीही मोठे झालो, तरी कुठेतरी कोणी तरी आपल्यापेक्षा अधिक कष्टाळू, अधिक बुद्धिमान, अधिक संयमी असतो. ही जाणीव आपल्याला कमी लेखत नाही; उलट ती आपल्याला अधिक समृद्ध बनवते. कारण खरे म...