मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....!
मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....! धुळे जिल्ह्यातील वलवाडी या छोट्याशा गावात जन्मलेले नीरज दिलीप चौधरी हे नावाने साधे, पण कर्तृत्वाने विलक्षण आहेत. गरीब व शेतकरी कुटुंबात वाढताना त्यांनी कष्टांचे मोल लहानपणापासूनच जाणले. उन्हातान्हात शेतात राबणारे आई-वडील, मर्यादित साधनसामग्री आणि साधे राहणीमान परंतु मनात मात्र मोठी स्वप्ने आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची अढळ जिद्द होती. लहानपणापासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राज्यस्तरावर खेळताना त्यांनी तब्बल दहा पदके मिळवली. प्रत्येक पदक हे त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि कुटुंबाच्या त्यागाचे प्रतीक होते. गावच्या मातीत वाढलेला हा खेळाडू स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे सर करू लागला. त्यांची झेप केवळ राज्यापुरती मर्यादित राहिली नाही. देशाचे प्रतिनिधित्व करत परदेशात खेळताना त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आणि पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या ऐतिहासिक क्षणी वलवाडी गाव, धुळे जिल्हा आणि संपूर्ण समाज अभि...