मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’
मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’ गावाकडच्या मातीमध्ये रुजलेली स्वप्नं जेव्हा अंकुरतात, तेव्हा ती केवळ शेती पुरती मर्यादित राहत नाहीत, तर समाजासाठी आशेचा किरण ठरतात. धानोरा या छोट्याशा गावातून असेच एक स्वप्न आकाराला आलं – श्री.संदीप युवराज गुजर यांचं. आज या स्वप्नाला यशाची उंच भरारी लाभली असून, त्याला ‘कृषीगौरव पुरस्कार’ रूपी सन्मान प्राप्त झाला आहे. चोपडा येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. तहसीलदार साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराथी आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने संदीपभाऊंचा गौरव करण्यात आला. हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नसून, एका विचाराचा, अथक परिश्रमाचा आणि मातीशी असलेल्या घट्ट नात्याचा आहे. संदीपभाऊंनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून, नाविन्यपूर्ण प्रयोग करत शेती पूरक व्यवसायांचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. विशेषतः त्यांनी विकसित केलेल्या पेरूच्या बागा आज जळगाव जिल्ह्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या आहेत. एखाद्या फळबागेचा सुगंध इतक्या दूरवर पोहोचेल, याची पूर्वी कल्पना ही कोणी केली नव्हती. या यशामागे संद...