पोस्ट्स

शांततेतून उगम होतो नवजीवनाचा....!

इमेज
शांततेतून उगम होतो नवजीवनाचा....! प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, पण एक गोष्ट मात्र सारखीच असते. सगळ्यांच्या वाट्याला येणारी वादळं. कधी ती दिसतात, कधी शांतपणे मनात घोंगावतात… पण त्या क्षणांना कोणीही चुकवू शकत नाही. काही वेळा आयुष्य इतकं कोसळतं, की आपल्याला वाटतं सगळं संपलं… पण अशा काळातच माणसाच्या खऱ्या ताकदीची ओळख होते. वादळं येणं हे चुकत नाही, पण त्यांना सामोरं जाण्याची पद्धत मात्र आपल्या हातात असते. काही क्षण असतात जेव्हा आपणही कोसळतो.मनाने, भावनांनी, विचारांनी… पण त्या कोसळण्याला थांबवायचं असेल, तर डोकं शांत ठेवणं, मन स्थिर करणं आणि परिस्थितीकडे एक पाऊल मागे घेऊन बघणं आवश्यक असतं. कारण कोणत्या ही संकटावर मात करणं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, तर छोट्या छोट्या प्रसंगात स्वतःचं संयम टिकवणं असतं. जीवनात वाद असतील, मतभेद असतील, दुःख असतील. पण त्याच वेळी त्यांच्यातून समजून घेण्याची कला शिकली, तर प्रत्येक वाद एक संवाद बनतो. मतभेद माणसांमध्ये अंतर निर्माण करतात, पण जर त्या मतभेदांमध्ये समजूत आणि शहाणपणा असेल, तर तेच संबंध अधिक मजबूत करतात. खूप वेळा एखादं नातं क्षणात तुटतं....

लेखणीचे जादूगार शब्दांमधून स्पंदणारी भावना....!

इमेज
लेखणीचे जादूगार शब्दांमधून स्पंदणारी भावना....! शब्द… केवळ अक्षरांचा संच नाहीत, तर ते हृदयाच्या गाभ्यातून उमटणाऱ्या संवेदनांचे प्रतिबिंब असतात. प्रत्येक अक्षर, प्रत्येक वाक्य हे मनाच्या खोल गर्भात उमटणाऱ्या भावनांचे प्रतिबिंब असते. लेखन ही केवळ कला नाही, ती आत्म्याचा आवाज आहे, विचारांची दिशा आहे, आणि हृदयाच्या ठोक्यांशी संवाद साधणारी अनोखी जादू आहे. जेव्हा कुणी मनापासून शब्दांचे धागे विणतो, तेव्हा ते वाचणाऱ्याच्या हृदयाला अलगद स्पर्श करून जातात. काही शब्द डोळ्यांतून अश्रू वाहवतात, काही ओठांवर गोड हसू फुलवतात, तर काही शब्द आयुष्याला नव्या दिशा देण्याचे सामर्थ्य ठेवतात. लेखन ही फक्त भावना मांडण्याची क्रिया नाही, ती वाचणाऱ्याच्या मनावर कोरला जाणारा अमिट ठसा आहे. एखाद्या कवीच्या ओळींतून विरहाची वेदना जाणवते, तर एखाद्या लेखकाच्या लेखणीतून प्रेरणादायी संघर्ष दिसतो. जसे पावसाच्या पहिल्या सरीने भुईसोनं सुगंध दरवळतो, तसेच काही शब्द हृदयाच्या पानांवर उतरतात आणि त्या प्रत्येक ओळीत जीव ओतला जातो. ज्या लेखणीत वेदनेची तीव्रता असते, संघर्षाची चाहूल असते, आणि प्रेमाची सरिता वाहत असते, ते श...

आरोग्याची ज्योत… माणुसकीच्या स्पर्शाने प्रज्वलित !

इमेज
आरोग्याची ज्योत… माणुसकीच्या स्पर्शाने प्रज्वलित  कधीकधी जीवनात दु:ख इतकं गडद होतं, की एखादी आशेची किरकोळ झुळूकही एखाद्याचं संपूर्ण आकाश उजळवून टाकते. गरिबी, आजारपण, असहायता आणि एकटेपणाच्या झळा सोसणाऱ्या अनेक चेहऱ्यांना अशीच एक झुळूक लाभली. प्रकाश शंकर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन या नावामध्येच समाजभान दडलेलं आहे.“आरोग्य म्हणजेच खरे धन” ही भावना फाउंडेशनने केवळ शब्दांत नाही, तर कृतीतून जगासमोर ठेवली. समाजातील जे दुर्बल, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. जे आजारपणाशी संघर्ष करत होते पण उपचारांची दारे त्यांच्यासाठी बंद होती. अशा लोकांसाठी या शिबिराने जीवनाची नवी दारं खुली केली. या आरोग्य शिबिरात उपचार हे उद्दिष्ट होतंच, पण त्याहूनही मोठं होतं एक माणूस म्हणून दुसऱ्याच्या दुःखाशी जोडून घेणं. रुग्णांच्या डोळ्यांतली असहायता समजून घेत, त्यांच्या वेदनांना फक्त औषध नव्हे तर आपुलकीचा स्पर्श देण्याचा हा प्रयत्न होता. शस्त्रक्रिया मोफत होत्या, पण त्या फक्त शरीराच्या जखमा भरून का...

चांगली वेळ नाही, चांगले माणसे शोधा.....!

इमेज
चांगली वेळ नाही, चांगले माणसे शोधा.....! चांगली वेळ येण्याची वाट बघणं, म्हणजे एक अशा आशेवर जगणं जिचं काहीच ठावं नसतं. आपल्याला असं वाटतं की, कधीतरी सगळं सुरळीत होईल, आयुष्य पूर्वपदावर येईल, सगळं हसतं-खेळतं होईल. पण तो "कधी तरी" नेमका कधी येतो, हे कोणालाच ठाऊक नसतं. आणि हे वाट बघणं कधी कधी इतकं एकटं करतं की, त्या शांततेच्या शोधात आपण आतून कोसळत जातो. पण आयुष्यात काही माणसं अशी येतात, की त्यांचं अस्तित्वच एक प्रकारची चांगली वेळ घेऊन येतं. त्यांच्या शब्दांमध्ये असतो एक विश्रांतीचा थेंब, त्यांच्या स्पर्शात असते एक आधाराची ऊब, आणि त्यांच्या अस्तित्वात असतो एक अढळ विश्वास की "तू एकटा नाहीस." चांगल्या माणसांबरोबर राहिलं की, आयुष्याचा संघर्ष ही हलका वाटतो. अंधारात त्यांचा हात धरला, की वाट सापडते. रडता नाही त्यांच्या कुशीत हास्य उमटतं. त्यांच्या अस्तित्वाने वेळेचं मोल बदलतं कारण त्यांच्या सहवासात वेळ थांबतो, पण दु:ख वाहून जातं. कधी कधी आपण एखाद्या विशिष्ट क्षणाच्या शोधात असतो. एखाद्या चांगल्या दिवशी, एखाद्या संधीच्या वेळी, एखाद्या चमत्कारी क्षणाची वाट पाहत असतो. ...

दिलदार मित्रांचा दिलदार मित्र विशालभाऊ सोनार...!

इमेज
दिलदार मित्रांचा दिलदार मित्र विशालभाऊ सोनार...! आज एक खास दिवस आहे. दिवस आहे अशा व्यक्तिमत्वाच्या जन्माचा, ज्यांचं नाव घेताच मन अभिमानाने भरून येतं. विशालभाऊ सोनार. मनसेचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख जरी राजकीय असली, तरी ती मर्यादित नाही. कारण भाऊंनी माणसांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बळावर. विशालभाऊ हे केवळ एक राजकीय नेते नाहीत, तर ते एक निस्वार्थी कार्यकर्ते, खंबीर नेता आणि प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होणारा मित्र आहेत. त्यांचं हसतं-खुलतं व्यक्तिमत्व, प्रत्येकाला आपलंसं वाटावं असं आहे. त्यांच्याशी बोलताना एक क्षणभर ही असं वाटत नाही की आपण कुठल्या मोठ्या पदावरील व्यक्तीशी बोलतो आहोत. त्यांच्या वागण्यात जी नम्रता आहे, तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. भाऊंच्या आयुष्यात अनेक आव्हानं आली, पण त्यांनी कधीही त्यातून पळ काढला नाही. लोकांसाठी रस्त्यावर उतरायची हिंमत त्यांच्यात आहे, आणि म्हणूनच त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. राज ठाकरे साहेबांच्या विचारसरणीवर निष्ठा ठेवून, भाऊंनी मनसेला गावपातळीवर नेलं. पण त्यांनी केवळ पक्ष वाढवला ...

आयुष्याची खरी संपत्ती आशीर्वादांची शिदोरी....!

इमेज
आयुष्याची खरी संपत्ती आशीर्वादांची शिदोरी....! जीवन ही एक अशी वाटचाल आहे, जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी साठवलं जातं. आठवणी, अनुभव, आनंद, दुःख, माणसं आणि त्यांचं आपल्या विषयीचं भावविश्व. काही साठवण हृदयात गोडसर गंधासारखी राहते, तर काही साठवण खोल कुठेतरी जखम करत राहते. म्हणूनच हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, की आयुष्यभर आपल्याला काय साठवायचं आहे. आपण सगळेच आपल्या परीने काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो. यश, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता… पण या सर्व गोष्टी शेवटी याच जगात राहून जाणार आहेत. माणूस जातो, आणि मागे राहतो त्याच्या आयुष्याचा सुगंध किंवा क्षोभ. तेव्हा खरा प्रश्न हा असतो, की आपण आपल्या आयुष्यात काय मागे ठेवून जात आहोत? जर काही "जमा" करायचं असेल, तर ते माणसांचे आशीर्वाद असावेत. कुणाच्या डोळ्यांतून निघालेलं कृतज्ञतेचं पाणी, कुणाच्या मनातून उठलेली प्रार्थना, ज्यात आपलं नाव असतं. हीच खरी संपत्ती असते. कारण हृदयातून निघणाऱ्या आशीर्वादांची ताकद अमूल्य असते. ती आपल्या जीवनात अ-visible, पण अमोघ शुभ ऊर्जा बनून साथ देत राहते. पण दुसरीकडे, जर कुणाच्या मनातून आपल्यासाठी त...

दिलदार मनाचा माणूस परेशभाऊ गुजर...!

इमेज
दिलदार मनाचा माणूस परेशभाऊ गुजर...! माणुसकी हीच खरी श्रीमंती असते, आणि ज्या माणसाच्या मनात ही श्रीमंती ओसंडून वाहते, तो म्हणजेच श्री. परेशभाऊ गुजर. धरणगाव युवक तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख असली, तरी त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण त्यांच्या दिलदार मनात दडलेलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या शुभक्षणी, त्यांच्या गुणांचं आणि कार्याचं स्मरण करणं म्हणजे खरंतर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणं आहे. राजकारण, समाजकारण आणि माणुसकी यांचं सुंदर संमेलन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतं. कोणता ही आव नाही, गर्व नाही. पण मनात सगळ्यांना आपलं मानण्याची एक विलक्षण ताकद आहे त्यांच्याकडे. दिलदार मन म्हणावं तर त्यासाठी मोठं हृदय लागतं. आणि परेशभाऊंचं हृदय खरंच खूप मोठं आहे. कोणती ही मदत लागो, कोणताही प्रसंग असो ते नेहमी पुढे असतात. त्यांच्या डोळ्यातली कणव आणि चेहऱ्यावरचं हास्य हे अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरतं. गरजूंना मदतीचा हात देणं, तरुणांना मार्गदर्शन करणं, आणि ज्येष्ठांचा मान राखणं. ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्यं आहेत. त्यांची राजकीय भूमिका ही सत्तेसाठी नाही, तर सेवेच...

विचारवंत शिक्षकाचा अमूल्य प्रवास…पी.जी.चौधरी सर

इमेज
विचारवंत शिक्षकाचा अमूल्य प्रवास…पी.जी.चौधरी सर शब्दांच्या पलीकडे जे असतं, ते मनाच्या आत खोलवर रूजलेलं असतं. भावना, आठवणी, अनुभव… आणि अशा प्रत्येक क्षणी सतत आठवणीत राहणारी काही माणसं. आज आपण अशाच एका असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील खास वळणावर उभे आहोत. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे, आपले सर्वांचे मार्गदर्शक, शिक्षक, आणि समाजभान जागृत ठेवणारे पुंडलिक गंभीर चौधरी सर, जे आज आपल्या जीवनाच्या ७७व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा केवळ एक वाढदिवस नाही, ही एक संपूर्ण जीवनयात्रेची साजरी केलेली सुंदर पर्वणी आहे. त्यांच्या ज्ञानदायी वाटचालीची, माणुसकीच्या शिक्षणाची, आणि सातत्याने समाजासाठी दिलेल्या योगदानाची ही ओळख नव्याने करून घेण्याची एक संधी आहे. शिक्षक म्हणून चौधरी सरांनी केवळ शाळेच्या भिंतींत आपलं कर्तृत्व सीमित ठेवलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनावर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर संस्कार घडवले. त्यांच्या शिकवणीत पुस्तकी ज्ञानासोबतच वास्तव जीवनाचं परखड आणि प्रामाणिक भान होतं. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ उत्तीर्ण होण्यासाठी शिकवलं नाही, तर त्यांना "सच्चं माणूस" बनण्याची...

टोकरतलावची उजळलेली पहाट....!

इमेज
टोकरतलावची उजळलेली पहाट....! एक जिल्हाधिकारी... पद, सत्ता, जबाबदारी, आणि समाजाच्या सतत नजरा... या सगळ्या प्रतिष्ठेच्या आणि दडपणाच्या वर्तुळात वावरताना, एक आई आपल्या मुलांसाठी निर्णय घेते. तो ही असा निर्णय, जो केवळ तिच्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि त्यांचे पती डॉ. वैभव सबनिस यांनी आपल्या जुळ्या मुलांचा शुकर आणि सबर यांचा प्रवेश नंदुरबार शहरातील टोकरतलाव येथील एका सर्वसामान्य अंगणवाडीत करून समाजव्यवस्थेला एक नवा दृष्टिकोन दिला आहे. हा निर्णय फक्त एक बातमी नाही, ही एका मूल्याधिष्ठित विचारसरणीची सुरुवात आहे. एक शांत पण ठाम चळवळ. या चिमुकल्यांना हातात धरून जेव्हा डॉ. मिताली सेठी टोकरतलावच्या अंगणवाडीकडे वळल्या, तेव्हा त्या केवळ एक आई नव्हत्या त्या व्यवस्थेवर विश्वास असणाऱ्या एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी होत्या. आज ज्या समाजात “सरकारी” या शब्दाकडे शंका, निराशा आणि हलकेपणाने पाहिलं जातं, त्या समाजात त्यांनी सरकारी यंत्रणेमध्ये आपल्या मुलांचं भविष्य शोधण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज अन...

जनतेसाठी झपाटून काम करणारे नेतृत्व...!

इमेज
जनतेसाठी झपाटून काम करणारे नेतृत्व...! धरणगाव नगरीत जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे धरणगाव शहराध्यक्ष आदरणीय श्री. लक्ष्मणराव पाटील सर यांना त्यांच्या जन्मदिनी आम्ही मनःपूर्वक, प्रेमळ आणि हार्दिक शुभेच्छा देतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांना आपल्या आवाजात आवाज देत, प्रत्येक कार्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत, समाजहितासाठी सातत्याने झटणारे नेतृत्व म्हणजे लक्ष्मणराव पाटील सर. त्यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव शहर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरावर नवे क्षितिज गाठत आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचा सुंदर संगम दिसतो. त्यांची दूरदृष्टी आणि माणुसकीची नजर हीच त्यांची खरी ओळख ठरते. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कार्याचा मागोवा घेतल्यास लक्षात येते की, ते केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर जनतेच्या मनामनात त्यांनी विश्वासार्हतेने आपलं स्थान निर्माण केलं आहे. गरज पडताच ते प्रत्येक गरजूंसाठी तत्काळ धाव घेतात. त्यांच्या कार्यशैलीत जसा काटेकोरपणा आहे, तसंच त्...

दिलदार माणूस बापुभाऊ महाजन....!

इमेज
दिलदार माणूस बापुभाऊ महाजन....! आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, कारण आज त्या व्यक्तीचा जन्मदिवस आहे, ज्यांचं नाव घेताच चेहऱ्यावर आपसूकच हास्य उमटतं आणि मनात सहजपणे आदराची भावना जागृत होते. जयेश किचन वेअरचे सन्माननीय संचालक श्री. बापुभाऊ महाजन. 'बापुभाऊ' हे नाव केवळ एका यशस्वी उद्योजकाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते एक अशा दिलदार, मनमिळावू आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक आहे, ज्यांनी आपल्या कृतीने, स्वभावाने आणि व्यवहारातून असंख्यांच्या मनावर अमीट छाप उमटवली आहे. व्यवसायाच्या गतीमान धावपळीत देखील त्यांनी "माणूसपण" कधीच गमावलं नाही. गरजूंना मदतीचा हात पुढे करणं, सामान्य व्यक्तीला मोठं होण्याची संधी देणं, आणि प्रत्येकाशी आपुलकीनं वागणं हीच त्यांची खरी श्रीमंती आहे. ते जितके यशस्वी उद्योजक आहेत, तितकेच ते प्रेमळ, संवेदनशील आणि मनमोकळे आहेत. त्यांच्या स्वभावात कुठेही अहंकार नाही, नाटकीपणा नाही. जे आहेत, ते मनापासून आहेत. म्हणूनच ‘बापुभाऊ’ ही केवळ व्यक्ती नसून, एक भावना बनली आहे. जिच्यात विश्वास आहे, माणुसकी आहे आणि प्रेरणा आहे. त्यांनी व्यवसा...

शांततेची किंमत...!

इमेज
शांततेची किंमत...! कधी कधी आपण अगदी बरोबर असतो. मन, बुद्धी आणि कृती सर्व काही योग्य असतं. तरी सुद्धा असा क्षण येतो, जेव्हा पुढे जाण्याऐवजी पाऊल मागे घ्यावं लागतं. कारण वाद वाढवण्यापेक्षा नातं टिकवणं अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून आपण माघार घेतो. ही माघार अनेकदा समोरच्याला विजया सारखी वाटते. पण वास्तवात ती माघार म्हणजे आपल्या संयमाची, समजूतदारपणाची आणि माणुसकीची जाणीव असते. चूक नसताना ही मौन पाळणं, हे कधीही दुर्बलतेचं लक्षण नसतं, तर ते अंतःकरणाच्या सामर्थ्याचं द्योतक असतं. काही माणसं, काही नाती आणि काही क्षण हे इतके मूल्यवान असतात की त्यांच्यासाठी स्वतःच्या ‘अहं’ला मागे टाकावं लागतं. सत्य आपल्या बाजूने असताना ही, ते बोलून जर नातं धोक्यात येणार असेल, तर त्यापेक्षा शांत राहणं योग्य वाटतं. ही शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे. ती प्रेम, समजूत आणि क्षमाशक्तीचं प्रतीक असते. ही एक अशी पवित्र माघार असते, जी नात्यांमध्ये फूट पडू नये म्हणून घेतलेली असते. कधी कधी काही क्षणांमध्ये उत्तर देणं सहज शक्य असतं, पण त्याचे परिणाम खोलवर जखमा करणारे असू शकतात. शब्दांनी झालेली जखम सहज भरून येत नाह...

सत्कार्याच्या वाटेवर एक नवा मुक्काम…...!

इमेज
सत्कार्याच्या वाटेवर एक नवा मुक्काम…...! एरंडोल नगरीत एक आनंदाची, अभिमानाची आणि अंतःकरणाला स्पर्श करणारी बातमी दरवळली. रोटरी परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि खजिनदार श्री. अरुणभाऊ माळी यांची महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ही केवळ निवड नव्हे, ही समाजाच्या विश्वासाची पावती आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार या प्रादेशिक विभागांमध्ये आता ते नेतृत्व करताना दिसणार आहेत. एकूण ४७० ज्येष्ठ सदस्यांच्या सहमतीने, त्यांच्या अनुभवाला, सच्चेपणाला आणि कार्यक्षमतेला मान्यता देत ही संधी त्यांना लाभली आहे. निवडणुकीच्या गोंगाटाशिवाय, कोणतीही स्पर्धा न घडवता, संपूर्ण सहमतीने आलेले हे पद म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मौनात गूंजणारं यश आहे. अरुणभाऊ माळी हे नाव एरंडोलसाठी अपरिचित नाही. ते निवृत्त तहसिलदार असून, त्यांनी आपल्या सेवाकाळात लोकांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्या सुटाव्यात यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न नेहमी केला. सरकारी यंत्रणेत राहून ही, त्यांनी माणुसकीचा धागा कधीही तुटू दिला नाही. त्यांच्या बोलण्यात मृदुता, वागण्यात संयम आणि कामात काटेकोरपणा ...

कवी प्रा. वा. ना.आंधळे यांचा कवितेच्या शब्दांतून जीवन-मृत्यूचा भावार्थ.....!

इमेज
कवी प्रा. वा. ना.आंधळे यांचा कवितेच्या शब्दांतून जीवन-मृत्यूचा भावार्थ.....! कविता ही मानवी मनाची सर्वांत सच्ची, हळवी आणि समृद्ध अभिव्यक्ती आहे. केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला दिशा, आधार आणि भावनांची नितांत साथ देते. अशीच कविता जेव्हा मृत्यूला ही सौंदर्याची किनार देते, तेव्हा ती केवळ कलाकृती न राहता, भावनांचा शाश्वत झरा बनते. प्रकाश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाघोदा ता. रावेर या संस्थेच्या हिरक महोत्सवा निमित्त आयोजित व्याख्यान मालेतील दुसरे पुष्प प्रा. वा. ना. आंधळे यांच्या प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत गुंफले गेले. दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात "जगण्या इतकेच मरणाला ही सुंदर करते कविता" या विषयावर त्यांनी केलेले भाषण विद्यार्थ्यांच्या मनाला भावस्पर्श करून गेले. प्रा. आंधळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, मानवी जीवन आणि मन कवितेमुळे अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या संत साहित्याचा तसेच खान्देशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ग्राम्य, परंतु गहिर्या ...

"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" – शिरसोलीत आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

इमेज
"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" – शिरसोलीत आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद अंतर्गत उपकेंद्र शिरसोली येथे एक अविस्मरणीय व सामाजिक भान जागवणारे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. मा. जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हे शिबीर केवळ एक तपासणी मोहीम नसून, आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. " स्वस्थ नारी – सशक्त परिवार " या अभियानाअंतर्गत, तसेच TB मुक्त भारत, किशोरी स्वास्थ्य सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्याची खरी गरज ओळखून, गावातील तब्बल 27 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या आरोग्याच्या प्रत्येक बारकाव्यांची काळजीपूर्वक नोंद घेतली गेली. या सोबतच एकूण 280 नागरिकांची तपासणी विविध आजारांसाठी करण्यात आली. या तपासणीमध्ये BP, डायबेटीस, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू, सशयित क्षयरोग , त...