गरज पडल्यावर आठवण येणारी मेणबत्ती....!
गरज पडल्यावर आठवण येणारी मेणबत्ती....! मनुष्यस्वभाव अत्यंत नाजूक असतो. आपल्याला कोणीतरी विनाकारण आठवण ठेवावी, आपल्यासाठी वेळ काढावा, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा मनापासून होते. पण वास्तव मात्र वेगळे असते. अनेकदा काही लोक आपली आठवण फक्त त्यांना गरज असते तेव्हाच घेतात. त्या क्षणी मनाला वेदना होतात वाटते, “मी इतकाच का? फक्त गरजेपुरताच?”जरा शांतपणे विचार केला, तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका साध्या उदाहरणात मिळते मेणबत्तीमध्ये. मेणबत्ती दिवसभर कुठल्या तरी कोपऱ्यात पडून असते. सूर्यप्रकाशात तिला गरज नसते; कोणाचेही लक्ष तिच्याकडे जात नाही. पण अंधार दाटल्यावर, वीज गेल्यावर, संकट आलेले असताना.तेंव्हा सर्वांना मेणबत्तीची आठवण येते. कारण तिच्यात अंधार दूर करण्याची ताकद असते. ती स्वतः जळते, वितळते, पण इतरांना प्रकाश देते. ती कधी तक्रार करत नाही. “दिवसभर मला का आठवलं नाही?” ती फक्त आपलं काम करते अंधार दूर करण्याचं. आपणही अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशीच मेणबत्ती असतो. लोक आपली आठवण तेव्हाच घेतात, जेव्हा त्यांना आधार हवा असतो, मदत हवी असते, किंवा सल्ला हवं असतो. ...