पोस्ट्स

दुसऱ्यासाठी झेपेल तितकंच देणे....!

इमेज
दुसऱ्यासाठी झेपेल तितकंच देणे....! आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही करण्याची इच्छा ठेवतो. आणि त्या कृतीत कोणताही स्वार्थ नसतो. फक्त एक भावना असते मदत करण्याची, आधार देण्याची, प्रेम देण्याची. कधी कुटुंबासाठी, कधी मित्रांसाठी, कधी इतरांनसाठी… आपण आपल्याकडून जे शक्य आहे तेच देतो. पण अनेकदा हे निःस्वार्थ प्रयत्न इतरांना समजत नाहीत. आपली साधी मदत, मनापासून केलेली काळजी काही लोकांना विचित्र वाटते. काहीजण आपल्याला वेड्यात मोजतात, काहीजण हसतात."इतके का झटतोस?", "हे का करत आहेस?" अशा प्रश्नांची पर्वा न करता आपण पुढे चालत राहतो. हेच जीवनाचे खरं ध्येय आहे.दुसऱ्यासाठी जे शक्य आहे ते देणे. आपल्याला पूर्ण देणे शक्य नसते, हे आपण जाणतो; पण जे काही दिले जाते, ते हृदयाने दिले जाते. आपले प्रयत्न, आपली दया, आपले प्रेम कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवतात, जरी कोणी ते पाहिले किंवा समजले नाही. जग प्रत्येकाला समजू शकत नाही. पण महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहतो. आपली निःस्वार्थता,आपले प्रयत्न,आपली मदत हेच खरे सामर्थ्य आहे. दुसऱ्या...

शास्त्री फार्मसी उमलत्या स्वप्नांचा विद्यार्थी दिन....!

इमेज
शास्त्री फार्मसी उमलत्या स्वप्नांचा विद्यार्थी दिन....! एरंडोल येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा उत्साह दरवळताच संपूर्ण परिसर नवचैतन्याने उजळून निघाला. ज्ञान, प्रेरणा आणि संस्कारांचा सुंदर संगम असलेल्या या दिवसाने विद्यार्थी शिक्षक नात्याला नवी ऊब मिळाली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल खरोखरच हृदयस्पर्शी ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांची प्रेरणादायी उपस्थिती आणि सचिव सौ.रूपा शास्त्री यांचे उबदार मार्गदर्शन कार्यक्रमाला विशेष अर्थ देणारे ठरले. प्रा. अनुप कुलकर्णी यांनी सुस्पष्ट आणि आकर्षक शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची संकल्पना प्रभावीपणे उलगडली. त्यांच्या संयत भाषाशैलीमुळे कार्यक्रमाने एक सुंदर लय साधली. कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मनोभावे सादर केलेल्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणतत्त्वज्ञानाचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाच्या दिशेने सातत्यपूर्ण वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्...

माणुसकीचं चलतं-बोलतं रूप नामदेवभाऊ मराठे.....!

इमेज
माणुसकीचं चलतं-बोलतं रूप नामदेवभाऊ मराठे.....! नामदेवभाऊ मराठे… त्यांच्या नावातच एक ऊब आहे, एक विश्वास आहे. त्यांना पाहिलं की मनात नेहमीच त्या हसऱ्या चेहऱ्याची प्रतिमा उभी राहते. ते हसू म्हणजे फक्त ओठांवरचं नाही, तर मनातून येणारं, समोरच्याला आश्वस्त करून जाणारं. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःपुरता मर्यादित झाला आहे, तिथे नामदेवभाऊ मात्र कोणाच्याही हाकेला नेहमी धावून जाणारे, “हो” म्हणत मदतीसाठी तयार होणारे एक अलभ्य रत्न आहेत. रुग्णालयात कोणतंही काम असो लहान असो किंवा मोठं, सोपं असो किंवा कठीण नामदेवभाऊ नेहमी पहिल्या पावलावर उभे राहून “मी आहे ना” असं सांगणारे. त्यांच्या उपस्थितीत रुग्णापासून ते नातेवाईकां पर्यंत प्रत्येकाला दिलासा मिळतो. त्यांच्या या सहजतेत कुठेही दिखावा नाही,तर माणुसकीच्या निखळ भावनेतून येणारा प्रेमळ स्पर्श आहे. ते ज्यांच्या सोबत असतात, त्यांचं मन आपोआप निर्धास्त होतं. दिलदारपणा हा शब्द जणू नामदेवभाऊंसाठीच बनवला आहे. ते स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करतात. मित्र म्हणून तर ते सोबत असणार नाहीत.तर कायम पाठीशी उभे राहणारे आहेत.त्यांचा स्वभाव इतका ...

परिवर्तनाच्या केंद्रस्थानी सौ. दर्शना ठाकूर एरंडोलच्या प्रश्नांना थेट भिडणारा प्रवास...!

इमेज
परिवर्तनाच्या केंद्रस्थानी सौ. दर्शना ठाकूर एरंडोलच्या प्रश्नांना थेट भिडणारा प्रवास...! एरंडोल : स्थानिक पातळीवर शांत स्वभाव, जमिनीवरचा दृष्टिकोन आणि सामान्य नागरिकांशी सलगी या गुणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या सौ. दर्शना विजयकुमार ठाकूर यांची नगरपरिषदेतील पंधरा वर्षांच्या सामाजिक संपर्कातून आणि पाच वर्षांच्या नगरसेविका कार्यकाळातून निर्माण झालेली प्रतिमा आज एरंडोलच्या चर्चेत आहे. शिक्षणाने ग्रॅज्युएट एमबीए आणि स्वभावाने सर्वसामान्यांशी जोडून घेणाऱ्या ठाकूर यांनी शहरातील प्रश्नांचा अभ्यास आणि त्यावर उपाययोजना याबाबत सातत्याने भूमिका मांडली आहे. एरंडोल नगरपरिषदेचा कारभार व नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित अडचणी यांचे जवळून अनुभव घेत असताना, शहराच्या प्रतिमेला बाधा आणणारे भ्रष्ट व्यवहार आणि कारभारातील अनियमितता ही ठाकूर यांनी वारंवार उपस्थित केलेली प्रमुख समस्या आहे. नगरपरिषद आणि शहराची शासकीय प्रतिमा सुधारण्याविषयी त्यांची भूमिका ठाम असून त्या पारदर्शकतेच्या प्रशासकीय तत्त्वांची सतत बाजू मांडताना दिसतात. शहरातील पाणीपुरवठा हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा व त्रासाचा विषय राहि...

कष्टांनी घडलेलं नाव,चापलुसीपेक्षा अनमोल....!

इमेज
कष्टांनी घडलेलं नाव,चापलुसीपेक्षा अनमोल....! बूट घासून बनवलेली ओळख बूट चाटून मिळवलेल्या इज्जतीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असते… माणसाच्या आयुष्याचा खरा अर्थ कष्टांत लपलेला असतो. आपल्या हातांतले रगाडे, कपाळावरचे घामाचे थेंब आणि न थकणाऱ्या प्रयत्नांनी तयार झालेली ओळख हाच जगण्याचा शुद्ध, स्वच्छ आणि खरा आधार असतो. बूट घासून कमावलेली ओळख ही केवळ पैशांत किंवा पदांत मोजता येत नाही;तिच्यात स्वाभिमान असतो, आत्मविश्वास असतो, आणि माणूस म्हणून स्वतःला उभं करण्याची ताकद असते. कष्टातून मिळालेली ओळख ही हळू हळू घडते, पण ती चिरस्थायी असते. कधी एखाद्याला आपले प्रयत्न दिसतात, कधी दिसत नाहीत, पण मनाला मात्र माहित असतं की आपण कमावलेलं सर्व काही आपल्या घामातून जन्मलेलं आहे. अशा ओळखीमध्ये दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. इतरांच्या कृपेपेक्षा स्वतःच्या परिश्रमाचा हात अधिक मजबूत असतो. याउलट बूट चाटून मिळवलेली इज्जत तिची चमक बाहेरून झळाळते, पण आतून ती पोकळ असते. ही इज्जत मिळवताना माणूस स्वतःचा स्वाभिमान दरवाज्याबाहेर ठेवून जातो. दुसऱ्यांचे मन वळवण्यासाठी नम्रता नव्हे, तर चापलुसी करावी लागते.आणि ...

आरोग्यसेवेची सावली डॉ.गीतांजली नरेंद्र ठाकूर...!

इमेज
आरोग्यसेवेची सावली डॉ.गीतांजली नरेंद्र ठाकूर...! एरंडोल शहराची धडधड केवळ रस्त्यांनी, बाजारांनी किंवा इमारतींनी जिवंत राहत नाही; ती जिवंत राहते येथील लोकांच्या मनातील परस्पर प्रेमानं, एकमेकांसाठी जगणाऱ्या भावनेनं आणि समाजकार्यातून सतत वाहणाऱ्या निस्वार्थ सेवेनं. या सेवाभावाच्या अथांग प्रवाहाला दिशा देणाऱ्या काही व्यक्ती समाजात दुर्मिळ असतात, आणि अशाच तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. सौ. ताईसाहेब गीतांजली नरेंद्र ठाकूर. नचिकेत इमेजिंग सेंटरच्या संचालिका म्हणून आणि एरंडोलच्या नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी समाजासाठी केलेल्या सेवांची नुसती यादी नाही, तर हजारो ह्रदयात स्थान मिळवलेली माणुसकीची एक जिवंत कहाणी आहे. आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा प्रवास हा फक्त डॉक्टर म्हणून केलेल्या कर्तव्यापुरता मर्यादित नाही. तो त्यांच्या मनात वसलेल्या दयेच्या, संवेदनशीलतेच्या आणि माणसांबद्दलच्या खास आपुलकीच्या भावनेतून जन्माला आलेला आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी त्यांना मनापासून समजतात. म्हणूनच त्यांच्या दवाखान्यात येणारा प्रत्येक रुग्ण केवळ ...

माणुसकीचा सुगंध पसरवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!

इमेज
माणुसकीचा सुगंध पसरवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...! धरणगावच्या ओळखीला एक वेगळंच तेज देणारे नाव म्हणजे दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी भगीरथ माळी सर.पत्रकारिता ही फक्त बातमी देण्याची कला नसते… ती माणसांच्या भावना जाणण्याची, त्यांच्या वेदनांना समजून घेण्याची आणि समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी मनापासून, प्रामाणिकपणे, कोणताही दिखावा न करता पेलणारा एक शांत, संयमी आणि दिलदार व्यक्ती म्हणजे भगीरथ माळी सर. भगीरथ माळी सर हे नाव घेताच मनात येतं एक माणुसकीनं परिपूर्ण हृदय,सर्वांना समान प्रेम देणारा स्वभाव,आणि नेहमी हसतमुख राहून लोकांना आधार देणारा हात. ते सहसा कोणाचंही मन दुखावणार नाहीत, उलट एखादा खिन्न झाला तर त्याला हसू देणारे, धीर देणारे, समजून घेणारे.पत्रकारितेत ठाम मतं ठेवणारे पण तरीही कोणावर अन्याय न होऊ देणारे.“जसा प्रश्न, तसंच प्रामाणिक उत्तर” देणारे. ही त्यांची खास ओळख. समाजात कोणताही कार्यक्रम असो, मदतीची वेळ असो, किंवा सत्य शब्दात मांडायचं असो भगीरथ माळी सर नेहमी पुढे असतात.त्यांच्या कामात आत्मीयता आहे, शब्दांत सत्यता आहे आणि म...

निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचे वधारलेले भाव...!

इमेज
निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचे वधारलेले भाव...! गावाच्या वेशीवर उभे राहिले की निवडणुकीचा सुगंध अगदी सहज जाणवतो. वाऱ्यावर फडकणारे झेंडे, चौकात रंगलेली पोस्टर्स आणि गल्लीबोळांत घुमणारी घोषवाक्ये जणू लोकशाहीचा उत्सव सुरू झाल्याची चाहूलच देत असतात. पण या साऱ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतात ते कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव उजळलेला आत्मविश्वास आणि चमकणारी आशा. निवडणुकीचा काळ हा कार्यकर्त्यांसाठी केवळ कार्यक्रम किंवा प्रचार नसतो; तो असतो त्यांची ओळख, त्यांची धडपड आणि त्यांच्या निष्ठेची परीक्षा. दिवसभर कडक उन्हात फिरल्यावरही त्यांच्या पावलांचा वेग मंदावत नाही, कारण त्यांना ठाऊक असतं.ही धावपळ फक्त पक्षासाठी नसते; ती असते त्यांच्या विश्वासासाठी. काहींच्या डोळ्यांत उमेद असते, काहींच्या आवाजात आर्त आवाहन, तर काहींच्या हसण्यात दडलेली मेहनत. रात्री उशिरा सभा-संमेलन संपल्यानंतर सगळे थकलेले असतात, पण कोणाच्या चेहऱ्यावरही तक्रारीची छाया दिसत नाही. कारण निवडणुकीचा हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी स्वप्न पूर्ण करण्याची संधी पक्षाचंच नाही, तर नेता-कार्यकर्त्यांच्या नात्याचं आणि सर्व...

पंजाब केसरी लाला लजपतराय एक महान देशभक्त

इमेज
पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या त्यांच्या ९७ व्या स्मृतीदिनानिमित्त लेख.    * पंजाब केसरी लाला*        *लजपतराय एक*             *महान देशभक्त*               भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि तेजस्वी नेते,'पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा जन्म सन : १८६५ सालातील जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला पंजाबमधील मोगा जिल्ह्याच्या धुडीके ग्रामात झाला. त्यांचे वडील मुंशी राधा कृष्ण हे उर्दू आणि फारसी भाषेचे शिक्षक होते.त्यांच्या आईचे नाव गुलाबी देवी असून त्या गृहिणी होत्या. .आई-वडिलांच्या सुसंस्कारात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी आदर्श विद्यार्थी जीवनाचे धडे बालपणातच लाला लजपत राय यांना दिले.शाळेमध्ये ते एक आदर्श विद्यार्थी होते.त्यांच्या विद्यार्थी देशातील गुण आजच्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणले पाहिजे.लाला लजपत राय यांनी लाहोर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यां...

सुख कष्टात अंधार लुबाडलेल्या पैशात....!

इमेज
सुख कष्टात अंधार लुबाडलेल्या पैशात....! कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो… पण लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडलेला असतो… या एका वाक्यात जीवनाचा खोल गाभा सामावलेला आहे. मनुष्य आयुष्यात कितीही उंच शिखर गाठू दे, पण त्या शिखराच्या पाया मजबूत असतात ते फक्त प्रामाणिकपणाने आणि कष्टाने. कष्टाचे पैसे म्हणजे स्वतःच्या घामाचा सुगंध, मेहनतीची कमाई आणि आत्मविश्वासाची माती. त्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो, कारण देवही त्यालाच सोबत देतो जो त्याच्या कर्मावर विश्वास ठेवतो. कष्टाच्या पैशातून आणलेला भाकर-भात छोटासा का असेना, पण त्यात तृप्तीचा स्वाद असतो; कारण तो कुणाच्या हक्कावर डाका टाकून आलेला नसतो. त्या पैशात घरातील वातावरणही शांत, मन प्रसन्न आणि हृदय समाधानी असतं. पण लुबाडलेल्या पैशात? त्या पैशात चमक असते, पण तेज नसतं. बाहेरून तो पैसा मोठा दिसतो, पण आतून त्यात असतात लोकांचे हुंदके, कुणाच्या डोळ्यात आलेले पाणी, कुणाच्या मनात साचलेला राग आणि कुणाचे उद्ध्वस्त झालेले स्वप्न. जेव्हा पैसा चुकीच्या मार्गाने कमावला जातो, तेव्हा त्याच्या प्रत्येक नोटेत एखाद्याचा हुंकार, एखाद्याची आर्त वेदना लपले...

संधी शोधू नका ती निर्माण करा....!

इमेज
संधी शोधू नका ती निर्माण करा....! जीवनात आपल्यापैकी बरेच लोक अशी वाट पाहत राहतात की “संधी कधी येईल?” दिवस, महिने, वर्षे उलटून जातात, आणि आपण अजूनही एका क्षणाची, एका प्रसंगाची अपेक्षा करत बसतो. वाट पाहताना आपल्याला वाटतं की कुणीतरी येईल, मदत करेल, योग्य वेळ येईल, किंवा परिस्थिती अचानक बदलेल. पण खरं तर जीवनात संधी ही बाहेरून येत नाही, ती आपल्या हातांनी, आपल्या प्रयत्नांनी निर्माण केली जाते. संधी ही जणू आपल्या आत दडलेली एक शक्ती आहे, जी फक्त आपण जागृत केली तरच दिसून येते. अपयश आले तरी धीर न हरणे, अडचणींचा सामना करणे, आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे. हेच त्या संधीला आकार देणारे घटक आहेत. जग बदलण्याची इच्छा असलेल्या माणसाला संधी कुठूनही मिळते, कारण तो स्वतःच तिचा शोध घेतो आणि तिच्या निर्मितीत विश्वास ठेवतो. कधी कधी आपण अपयशाच्या सावल्यांमध्ये अडकतो, त्रास, टीका, किंवा निराशा आपल्याला थांबवायला लावतात. पण त्या सावल्यांमागेच नवे दरवाजे, नवे अनुभव, नवे शिकण्याची संधी दडलेली असते. थांबण्या ऐवजी पुढे पाऊल टाकणे, स्वतःची वाट तयार करणे हेच खरे यश घडवते. प्रत्येक छोटा प्रयत्न, प्रत...

आदिवासी समाजक्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा

इमेज
आदिवासी समाज क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लेख आदिवासी समाजक्रांतीचे  जनक भगवान बिरसा मुंडा        आदिवासी समाज क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू या ग्रामामध्ये झाला.ते मुंडा आदिवासी जमातीचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हातू होते. ते आदिवासी हक्क, स्त्री-स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा यासाठी लढा देणाऱ्या पहिल्या आदिवासी नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांचे शिक्षण जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये झाले.शाळेत मुंडा आदिवासींबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले होते , म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले.त्यांनी हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी धर्मातील चांगली तत्त्वे एकत्रित करून 'बिरसाईट' (Birsaites) या नव्या धर्माची स्थापना केली. यामुळे त्यांनी मुंडा जमातीत एकता निर्माण केली आणि ते 'भगवान बिरसा' आणि 'धरती अब्बा' (पृथ्वी...

मनात सदैव जिवंत राहणारे शरदकुमार बन्सी सर...!

इमेज
मनात सदैव जिवंत राहणारे शरदकुमार बन्सी सर...! स्व. शरदकुमार बन्सी सर… एक साधं नाव, पण मनात कायम घर करून राहिलेली व्यक्ती. धरणगावच्या लोकमत दैनिकाचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक, समाजातील प्रत्येकाच्या सुख–दुःखात सामील होणारा एक दिलदार माणूस… आज ते आपल्या सोबत नाहीत, हे स्वीकारणं आजही कठीण जातं. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, सुसंस्कृतपणा आणि माणुसकीची ऊब. कुणालाही न दुखवता, सर्वांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची जणू जीवनशैलीच होती. गावातल्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक समस्येत, प्रत्येक आनंदात ते प्रेमाने, मनापासून सहभागी व्हायचे. जेथे शरदकुमार सर असायचे, तेथे वातावरणात आपोआपच प्रसन्नता पसरायची. त्यांचा वाढदिवस… आजचा दिवस. पण ते नसल्याची पोकळी आणखी प्रकर्षाने जाणवते. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण अधिक तीव्र होते, कारण त्यांच्या आठवणीतही प्रेम, आदर आणि माणुसकीचंच तेज आहे. आज जरी ते या जगात नसले तरीही त्यांच्या शिकवणी, त्यांचे हसू, त्यांची निष्ठा, आणि त्यांचे प्रेम धरणगावकरांच्या मनात आजही तितकंच जिवंत आहे. त्यांनी दिलेल्या मूल्यांची संपत्ती प्रामाणिकपणा,...

आरसा आणि माणुसकी....!

इमेज
आरसा आणि माणुसकी....! आरसा एक शांत साक्षीदार.तो आपल्या चेहऱ्यावरचं हास्य दाखवतो, ओठांवरील बनावट हसूही दाखवतो, पण मनातलं काहीच दाखवत नाही.आपण दररोज आरश्यात स्वतःला पाहतो, केस विंचरतो, चेहरा नीट करतो, पण कधी स्वतःच्या मनाकडे पाहायचा प्रयत्न करतो का? मनात राग, मत्सर, गर्व, द्वेष…हीच ती घाण आहे जी आरशात दिसत नाही.पण हीच घाण माणसाचं खरं सौंदर्य हरवून टाकते.चेहरा कितीही सुंदर असो, पण जर मन कुरूप असेल. तर त्या सौंदर्याला काहीच किंमत उरत नाही. कल्पना करा, जर आरसा फक्त चेहरा नाही तर मनही दाखवू शकला असता.तर कदाचित आपण स्वतःकडे पाहायला ही घाबरलो असतो.तेव्हा लक्षात आलं असतं की आपले राग, आपले कटु शब्द, आपला गर्व, आपली असहिष्णुता हे सर्व आपल्या चेहऱ्यावरील तेज कसं हिरावून नेत आहेत. जर आरशात हे सगळं दिसलं असतं.तर कदाचित आपण रागा ऐवजी शांतता शिकली असती,द्वेषा ऐवजी प्रेम जोपासलं असतं,गर्वा ऐवजी नम्रता स्वीकारली असती.कारण कुणालाही स्वतःचं कुरूप रूप पाहायला आवडत नाही. माणसातली माणुसकी आज हरवते आहे.कारण आपण मनाचा आरसा स्वच्छ ठेवणं विसरलो आहोत.आपण चेहऱ्यावर मुखवटे लावतो, पण मनात मात्र कटुता साठ...

ओळख मनाची.....!

इमेज
ओळख मनाची.....! माणूस या पृथ्वीवर जन्माला येतो तेव्हा तो निरागस असतो.मनाने निर्मळ, विचारांनी पवित्र. त्याच्या मनात द्वेष नसतो, वाईटपणा नसतो, फसवणूक नसते. पण जशी जशी वेळ पुढे सरकत जाते, तसं जीवन त्याला वेगवेगळ्या वाटांवर उभं करतं. काही वाटा सोप्या असतात, काही खडतर, काही अंधारलेल्या. आणि त्या वाटांवर चालताना कधी कधी माणूस आपल्या इच्छेने नव्हे, तर परिस्थितीच्या ओढीने चुकीचं वागतो. माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही.त्याचं मन चुकीचं नसतं, पण कधी परिस्थिती, कधी समाज, कधी लोकांची अपेक्षा आणि कधी काळाची वळणं त्याला अशा दिशेला नेतात जिथे चुकाही घडतात.आणि मग लोक त्या चुकांवर निर्णय देतात, पण त्या चुकांमागचं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न फार थोडे करतात. जगात प्रत्येक जण आपल्या परीने योग्यच वागत असतो. पण जेव्हा परिस्थितीचा ताण येतो, तेव्हा काही वेळा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध वागावं लागतं. आपण चुकीचे नसतो, पण परिस्थिती चुकीची असते.पण अशा वेळीही जो माणूस आपल्या शब्दाला जागतो, आपल्या मूल्यांवर ठाम राहतो, आणि शेवटपर्यंत साथ देतो. तोच खरा माणूस ठरतो. वेळ चांगली असो वा वाईट, नाती टिकवणं, द...