स्वभाव ओळखणे हीच खरी कला....!
स्वभाव ओळखणे हीच खरी कला....! मनुष्याच्या आयुष्यात अनेक नाती येतात.काही फुलांसारखी सुगंध देणारी, तर काही काट्यांसारखी जखमा देणारी. आपण ज्या प्रत्येक व्यक्तीला भेटतो, त्या प्रत्येकाच्या वागण्यात काही वेगळेपण असते. हे वेगळेपणच पुढे जाऊन त्यांचा स्वभाव बनतो. आणि स्वभाव… तो असा असतो की, कितीही प्रयत्न केले, कितीही प्रेम दिले, कितीही समजुतीने समजावले, तरीही तो बदलत नाही.जसे म्हणतात “गाढवाच्या पाठीवर कितीही हात फिरवला तरी तो संधी साधून लाथ मारतोच…!” काही लोकांत सुरुवातीपासूनच एक हट्टीपणा दिसतो. त्यांच्याशी कितीही प्रेमाने बोला, तरी ते स्वतःच्या जगात रमलेले राहतात. त्यांचे तत्त्व, विचार आणि राग तेच त्यांच्या आयुष्याचे शासक असतात. आपण कितीही संयमाने, शांतपणे त्यांना त्यांची चुका दाखवून देत असलो, तरी त्यांच्या मनाचा दरवाजा बंदच राहतो. अनेकदा आपण स्वतःला बदलतो.आपली बोलण्याची पद्धत बदलतो, आपले वर्तन बदलतो.फक्त एवढ्यासाठी की कदाचित समोरची व्यक्ती बदलून जाईल. पण शेवटी जाणवते की आपण फक्त स्वतःलाच थकवत आलो आहोत. मानवी नात्यांमध्ये एकच मोठा भ्रम असतो.“मी त्याला/तिला बदलू शकतो.”पण खरे तर प्...