धरणगाव तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न
धरणगाव तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न धरणगाव येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे. जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय , जळगाव. पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा अंतगर्त कॅरम स्पर्धा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व खेळाचे नियमांबाबत मार्गदर्शन तालुका क्रिडा समन्वयक श्री एस एल सूर्यवंशी सरांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटक शाळेचे पर्यवेक्षक श्री एम बी मोरे सर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री राजेंद्र सैंदाणे शिक्षण विस्तार अधिकारी धरणगाव यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले स्पर्धेचे पंच म्हणून साळवे इंग्रजी विद्यालयाचे क्रिडाशिक्षक श्री विनायक कायंदे सर, श्री जितेंद्र ओस्तवाल पण बारी सर श्री डी एच कोळी सर व ज्ञानेश्वर घुले सर फिलीप गावीत सर यांनी काम पाहिले . स्पर्धा यशविस्तेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे क...