ज्ञानेश्वरजी आमले : लोकांची निःस्वार्थ साथ
ज्ञानेश्वरजी आमले : लोकांची निःस्वार्थ साथ जवखेडेसिम या छोट्याशा गावात जन्मलेल्या ज्ञानेश्वरजी आमले यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांचं शिक्षण केवळ बी.ए.पर्यंतच मर्यादित राहिलं. मात्र, मनात काही तरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द कायम होती. सन १९९५ मध्ये त्यांनी एरंडोल येथे स्टॅम्प व्हेंडर आणि बॉण्ड रायटर म्हणून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करत लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची ओळख एक प्रामाणिक आणि माणसं जोडणारा उद्योजक म्हणून निर्माण झाली. त्यांना राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा मार्ग वाटला नाही, तर समाजाच्या विकासासाठीची एक संधी आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. त्यांचं नेतृत्व राजकीय पातळीपुरतं मर्यादित न राहता, थेट लोकांच्या हृदयात स्थान मिळवून गेलं. म्हणूनच आज त्यांना आदरपूर्वक "नानासाहेब" म्हणून ओळखलं जातं. सन २००१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणतं पद होतं, ना सत्तेची हाव. होती ती फक्त जनतेसाठी काहीतरी भरीव काम करण्या...