पोस्ट्स

पत्रकार म्हणजे कोण....?

इमेज
पत्रकार म्हणजे कोण....? पत्रकार म्हणजे केवळ बातम्या सांगणारा नाही, तो समाजाच्या जखमा ओळखणारा, त्यावर आवाज उठवणारा आणि सत्याची मशाल घेऊन अंधारात मार्ग दाखवणारा एक योद्धा असतो. आजच्या धावपळीच्या, बाजारू जगात पत्रकारितेच्या नावाखाली अनेक गोष्टी घडत आहेत.काही जणांनी पत्रकारितेला खालच्या थरावर आणून ठेवलं आहे, हे खरे आहे. काही पत्रकार चापलूसी करतात, पैशासाठी, प्रसिद्धीसाठी सत्याशी तडजोड करतात. पण म्हणून का आपण सगळ्यांनाच दोष देणार? एका मळलेल्या फळामुळे संपूर्ण झाड वाईट ठरत नाही, तसंच एका पत्रकाराच्या चुकीमुळे संपूर्ण पत्रकारितेचा अपमान करणं हे अयोग्य आहे का ? आजही असे अनेक पत्रकार आहेत जे पिढ्यान्‌पिढ्या कष्ट करून, प्रामाणिकपणे, जीव धोक्यात घालून, सत्य जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. कोणत्याही दबावाखाली न झुकता, कोणत्याही लालसेला थारा न देता, आपल्या तत्त्वांवर ठाम राहून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. दंगली असोत, पूर असो, दुष्काळ असो की युद्धजन्य परिस्थिती सामान्य नागरिक मागे हटतो, पण पत्रकार तिथे पोहोचतो. का? कारण त्याला फक्त ‘बातमी’ द्यायची नसते, तर समाजासमोर ‘सत्य’ मांडायचं असत...

मी आहे पण कुणासाठी....?

इमेज
मी आहे पण कुणासाठी....? चार दिवस कुठे तरी हरवून बघा...लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील.तुमचं अस्तित्व त्यांच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं असतं,जसं एखादं रिमझिम पावसाचं थेंब जे येताना मनाला सुखावतो, पण निघून गेल्यावर त्याचं अस्तित्व फक्त ओलसर आठवणीत उरतं. माणूस मात्र एक भ्रम मनात बाळगत असतो."मी फारच महत्त्वाचा आहे. माझ्याशिवाय यांचं काहीही चालणार नाही."पण आयुष्य त्याला एक दिवस नकळत शिकवून जातं."तुमचं असणं आणि नसणं या जगासाठी फार काही बदलून टाकत नाही." आपण अनेकदा लोकांच्या गरजांसाठी धावतो. प्रेम करतो, समर्पण करतो, वेळ देतो…पण सत्य हेच आहे की,"ज्याची जेवढी गरज, त्याची तेवढीच किंमत." तुमचा उपयोग असे पर्यंत लोक तुमचं महत्त्व जाणतात. पण ज्या दिवशी त्यांना वाटतं की "आता मला काही अडत नाही",त्या दिवसापासून तुमचं अस्तित्व त्यांच्या आयुष्यातून दुर्लक्षित होत जातं. हे जाणवणं कठीण असतं, वेदनादायक असतं.पण हीच हकीकत आहे.जग थांबत नाही.वेळ कुणासाठी ही थांबत नाही.जसं एखादं झाड सुकतं आणि त्यावर वसलेले पक्षी क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या झाडावर उडून जातात…...

प्रत्येक कृतीचा आरसा....!

इमेज
  प्रत्येक कृतीचा आरसा....! ‘कर्म’ हा शब्द उच्चारायला जरी सोपा असला, तरी त्याचा अर्थ मात्र अतिशय खोल आहे. आपण दररोज असंख्य गोष्टी करतो. बोलतो, विचार करतो, कृती करतो... आणि त्या विसरूनही जातो. मात्र, कर्म काही विसरत नाही. आपण केलेली प्रत्येक कृती ती चांगली असो वा वाईट  एका अदृश्य यंत्रात जमा होत जाते. आणि आयुष्यात एखादा क्षण असा येतो, जेव्हा आपण सगळं विसरून आपलं जीवन जगत असतो, तेव्हा हेच कर्म आपल्या समोर उभं राहतं. त्या क्षणी कर्माची जी थाप बसते, तिचा आवाज इतका स्पष्ट असतो की ती टाळताही येत नाही आणि दुर्लक्षही करता येत नाही. आजच्या जगात हुशारी आणि चालकी हे गुण यशाचं मापदंड मानले जातात. पण जर ही हुशारी दुसऱ्याचा हक्क हिरावून घेत असेल, जर चालकी कोणाचं आयुष्य उध्वस्त करत असेल, तर ती यशाची नाही, तर अध:पतनाची सुरुवात असते. अनेकदा एखाद्या चतुर व्यक्तीचं आयुष्य अचानक कोसळतं, तेव्हा लोक आश्चर्याने विचारतात, "असं काय झालं?" पण त्यांचं कर्मच त्या प्रश्नाचं उत्तर देतं "हेच त्यांनी कधी काळी पेरलेलं होतं." वाईट करावं, असं कोणी थांबवत नाही. कोणाच्या पाठीमागे वार करावेत...

शांततेपलीकडचं नातं....!

इमेज
शांततेपलीकडचं नातं....! जो पर्यंत एखादा माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय,नको ती बडबड करतोय.तो पर्यंत तो माणूस आपलाच असतो. कारण या सगळ्या भावना राग, रुसवा, भांडणं, आणि सततचं बोलणं या त्या व्यक्तीकडूनच येतात,ज्याच्याशी आपलं नातं खऱ्या अर्थाने जिव्हाळ्याचा असतं.ज्याच्या कडून काही अपेक्षा आहेत,त्याच्याकडेच तक्रारीही केल्या जातात. कोणी आपल्यावर रागावतो,तर ते नातं टिकवण्यासाठीच.भांडणं करतो, कारण संवादाची गरज वाटते.बोलतो, कारण त्याच्या मनात साचलेलं काहीतरी असतं.आणि अपेक्षा ठेवतो, कारण त्याला वाटतं. "तू माझा आहेस… तू वेगळा नाहीस." पण… एक दिवस असा येतो.जेव्हा सगळं अचानक थांबतं… ना राग, ना रुसवा, ना भांडणं, ना तक्रार.कोणतीच अपेक्षा उरलेली नसते.आणि त्या क्षणाला समजतं. खरा माणूस आपल्या हातून निसटून गेला आहे. त्या दिवशी तो माणूस "आपला" राहात नाही.तो तुमच्यात असूनही मनाने फार लांब गेलेला असतो. ना शब्द, ना भावना फक्त एक शांत नजरेतली निर्विकार झलक.आणि तिथेच, नकळतपणे, नात्याचा अंत होतो… शांत राहणं ही केवळ समजूतदारी नसते,कधी कधी ती असते.हृदयाच्य...

नेतृत्व अहंकार नसलेली आघाडी...!

इमेज
नेतृत्व अहंकार नसलेली आघाडी...! "कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून,जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून,त्यांना सोबत घेऊन प्रगती साधणे होय." या एका वाक्यात नेतृत्वाचे खरे स्वरूप सामावले आहे. नेतृत्व म्हणजे केवळ सिंहासनावर बसून आदेश देणे नव्हे,तर लोकांच्या मनात स्थान मिळवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून,त्यांना प्रेरणा देत पुढे नेणे हेच खऱ्या अर्थाने नेतृत्व होय. नेतृत्व हे अधिकारासाठी नव्हे, तर कर्तव्यासाठी असते. ते एखाद्या पदासाठी नसून, जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता असते.नेतृत्व करताना एक नेता लोकांसोबत चालतो, त्यांच्या भावना समजून घेतो,आणि त्यांच्या बरोबर प्रगतीचा मार्ग शोधतो. इतिहासात असंख्य नेते होऊन गेले,परंतु त्यांपैकी फार थोडेच लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करू शकले.कारण त्यांचे नेतृत्व भीतीवर नव्हे, तर प्रेमावर आधारित होते.ते लोकांवर हुकूमत चालवत नव्हते, तर त्यांच्या सोबत चालत होते. खरे नेतृत्व करणारा नेता हा नेहमी मार्गदर्शक असतो. तो अंधारात मार्ग दाखवतो, संकटांना सामोरे जातो, आणि स्वतःच्या कृतीद्वारे इतरांसमोर आदर्श ठ...

माघार चांगुलपणाची किंमत...!

इमेज
माघार चांगुलपणाची किंमत...! काही गोष्टी आपल्या मनाला खोलवर भिडतात. अगदी अशा की, त्या शब्दांत मांडणंही अवघड वाटतं. सतत घेतलेली माघार आणि प्रत्येकवेळी दाखविलेला चांगुलपणा, हे जणू आपल्याला शिकवलेलं असतं. घरातून, संस्कारांतून, समाजाकडून. पण याच गोष्टी जेव्हा आपलाच घात करतात, तेव्हा ती चूक कुणाची? आपल्याला सांगितलं जातं शांत राहा, समजून घ्या, क्षमा करा, रागावर प्रेमानं मात करा. आपण ते मनापासून करत राहतो. भांडणं टाळण्यासाठी आपण पहिल्यांदा माघार घेतो. कुणी कठोर बोललं, तरी आपण हसून दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला नातं टिकवायचं असतं, आपल्याला वातावरण शांत हवं असतं. पण हळूहळू असं लक्षात येतं की, आपल्या चांगुलपणाची सवय होते लोकांना. आणि मग ते त्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला लागतात. जेव्हा चूक दुसऱ्याची असते, तेव्हा सुधारणं आपल्याकडून अपेक्षित असतं. जेव्हा दुसरा ओरडतो, तेव्हा आपण शांत का नाही राहिलो, यावर चर्चा होते. आपली माघार, आपली समजूत, आपला संयम  हे सगळं एकतर्फी होत जातं. मन थकतं, आत्मा दुखावतो. कारण जेव्हा आपल्याला एखाद्याच्या आधाराची गरज असते, तेव्हा आपलं "नेहमी मजबूत असलेलं...

एक हाडाचा कार्यकर्ता शेतकरी पुत्र दिपकभाऊ भदाणे..!

इमेज
एक हाडाचा कार्यकर्ता शेतकरी पुत्र दिपकभाऊ भदाणे..! बिलखेडा हे एक साधं, शांत आणि सामान्य गाव. याच गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात दिपकभाऊ भदाणे यांचा जन्म झाला. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, त्यांनी केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या, मेहनतीच्या आणि निष्ठेच्या बळावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. राजकारणात घराणेशाहीचे प्रभाव असताना, दिपकभाऊंचं पुढे येणं आणि नेतृत्वाचं स्थान मिळवणं हे खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं. एक सर्वसामान्य युवासैनिक शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासास सुरुवात करणाऱ्या दिपकभाऊंनी कोणताही गाजावाजा न करता, पक्षनिष्ठा आणि जनतेची सेवा हाच ध्यास घेतला. आणि हाच त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना "युवासेना तालुकाप्रमुख" या महत्त्वाच्या जबाबदारीपर्यंत घेऊन आला. त्यांचा हा प्रवास केवळ पदांपर्यंत पोहोचण्याचा नव्हता, तर तो होता विचारांचा, सेवाभावाचा आणि अहोरात्र जनतेसाठी झगडणाऱ्या एका खऱ्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा प्रवास. दिपकभाऊंची ओळख ही त्यांच्या पदावरून नाही, तर त्यांच्या कामातून होते. त्यांनी गावागावात लोकांपर्यंत पोहोचून, माननीय ...

जिथे नावही अस्मितेचं प्रतीक ठरतं...!

इमेज
जिथे नावही अस्मितेचं प्रतीक ठरतं...! गावाचं नाव म्हणजे केवळ काही अक्षरांची रचना नसते. ते त्या भूमीचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि तिथल्या माणसांचं अस्तित्व दर्शवत असतं. गावाचं नाव चुकीच्या पद्धतीने लिहिलं जाणं ही केवळ एक भाषिक चूक नसते, तर त्या गावाच्या अस्मितेवरच घाला असतो. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पद्मालय या ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गावांची नावं चुकीच्या स्वरूपात सार्वजनिक फलकांवर झळकत होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (NH-6) वर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर ही नावं “एरंडोळ” आणि “पद्माळय” अशा चुकीच्या स्वरूपात लिहिलेली दिसत होती. या चुकीमुळे अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत होता, तसेच स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र नाराजी होती. ही चूक फक्त अक्षरांची नव्हती, तर गावाच्या इतिहास आणि अस्मितेचा अपमान करणारी होती. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तो अ‍ॅड. आकाश महाजन या संवेदनशील आणि जिद्दी तरुणाने. आपल्या गावाची खरी ओळख अबाधित राहावी या उद्देशाने त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), दिल्ली मुख्यालय तसेच जळगाव येथील प...

पैसा की माणूस.....?

इमेज
पैसा की माणूस.....? आजचा माणूस कितीही शिकलेला, यशस्वी आणि बुद्धिमान असला, तरी जेव्हा त्याच्या मनात पैशाची हाव निर्माण होते, तेव्हा तो सर्वांत अडाणी ठरतो. कारण अशा वेळी तो आपले माणूसपण गमावतो. पूर्वी माणूस नात्यांमध्ये गुंतलेला असायचा. एकमेकांना वेळ द्यायचा, आपुलकीने संवाद साधायचा, आणि माणुसकी जपत जगायचा. पण आज तो व्यवहारांच्या जाळ्यात अडकून गेला आहे.पैशाच्या मागे धावताना त्याला हेच आठवत नाही, की नाती हीच आयुष्यातली खरी संपत्ती आहेत. आजची परिस्थिती पाहिली, तर काळीज सुन्न होतं. आईवडील वृद्धाश्रमात राहतात, भावंडं न्यायालयाच्या दारात उभी आहेत, आणि जिवाभावाची माणसं गैरसमजांमध्ये हरवलेली आहेत. आणि या साऱ्याचं मूळ काय? तर काही रुपये, जमिनीचा वाद, व्यवसायाची वाटणी किंवा एखादं घर! माणूस पैशासाठी नाती तोडतो, पण हे विसरतो की पैसा क्षणिक असतो. आज आपल्या हातात असलेला पैसा उद्या दुसऱ्याच्या खिशात जातो. पण एकदा हरवलेली माणसं, तुटलेली नाती आणि संपलेली माया, पुन्हा मिळवणं केवळ अशक्य असतं. पैशासाठी आपण आपल्या जवळच्या माणसांवर ओरडतो, अपमान करतो, त्यांचं मन दुखावतो. अशा वागणुकीतून आपण नात्याचा...

दिवाळीच्या प्रकाशात माहेरची सावली.....!

इमेज
दिवाळीच्या प्रकाशात माहेरची सावली.....! दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. पण प्रत्येक स्त्रीसाठी, विशेषतः एका लेकीसाठी, दिवाळी हा काळ अधिक भावनिक आणि हृदयस्पर्शी ठरतो. कारण ही ती वेळ असते, जेव्हा ती पुन्हा एकदा "बापाच्या घरची लेक" होते. माहेर हे केवळ एक घर नसते, तर ते एक भावविश्व असते. जिथे तिच्या अस्तित्वाचा प्रत्येक कोपरा परिचित असतो. जिथे दरवाज्याच्या चर्र आवाजात तिच्या लहानपणाच्या आठवणी दडलेल्या असतात. आणि दिवाळीचं नाव जरी घेतलं गेलं, तरी तिच्या मनात सर्वात आधी आठवतो तो माहेरचा आंगण, आईने सजवलेली रांगोळी आणि वडिलांनी खास तिच्यासाठी आणलेली फटाके-फराळाची पिशवी. सासर सुखाचं असतं, ते तिचं दुसरं घर असतं. पण तरीही, माहेरसारखी ओढ, माहेरसारखी माया, कुठेच आणि कधीच मिळत नाही. कारण माहेर हे केवळ रक्ताचं नातं नसून, ते प्रेमाचं, आठवणींचं आणि मनाच्या स्पर्शाचं नातं असतं.माहेरी ती 'आई' नसते, ती 'सून'ही नसते… ती असते फक्त एक मुलगी.आणि दिवाळी म्हणजे त्या मुलीला पुन्हा एकदा तिचं स्वत्व गवसण्याचा, तिच्या अस्तित्वाची उजळणी होण्याचा काळ! दिवाळी जवळ येऊ लागली, की तिचं ...

धरणगाव नगरपरिषदेत स्नेहमयी दीपावली...!

इमेज
धरणगाव नगरपरिषदेत स्नेहमयी दीपावली...! धरणगाव नगरपरिषद कार्यालयात यावर्षीची दिवाळी एक वेगळ्याच प्रकाशाने उजळून निघाली. पारंपरिक रोषणाईच्या दिव्यांपलीकडे, येथे प्रकट झाला तो माणुसकीचा, आपुलकीचा आणि सन्मानाचा उजेड. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेला दिवाळीचा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा नव्हता, तर तो होता जिव्हाळ्याचा, स्नेहाचा आणि कृतज्ञतेचा अनुभव. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा कार्यक्रम प्रशासन व कर्मचारी यांच्यातील संबंध अधिक बळकट करणारा एक सुंदर प्रयत्न ठरला. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला आणि एकात्मता, स्नेह व सेवाभावाचे मौल्यवान विचार उपस्थितांपर्यंत पोहोचवले. या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश आणि मिठाई, तर महिला कर्मचाऱ्यांना साडी भेट म्हणून देण्यात आली. हे वाटप केवळ वस्तूंचे वितरण नव्हते, तर त्या मागे असलेली कृतज्ञता, सन्मान आणि गौरवाची भावना होती. रोज शहराची स्वच्छता, सुंदरत...

शब्दांचे शिल्पकार कैलास चव्हाण-पाटील...!

इमेज
शब्दांचे शिल्पकार कैलास चव्हाण-पाटील...! शब्द हे तलवारीपेक्षा तीव्र असतात,असं म्हणतात. पण या शब्दांना जर योग्य दिशा मिळाली आणि सजग मन लाभलं, तर ते समाज परिवर्तनाचे साधन ठरतात. अशाच शब्दांच्या वाटेवर चालत, दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाशी नातं जोडणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे. कैलास पुंजाराम चव्हाण-पाटील. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील शेंदुर्णी या छोट्याशा खेडेगावात, एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती सोपी नव्हती, पण स्वप्नं मोठी होती. चिखलओहोळ या गावात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 1986 साली ते नाशिक शहरात पुढील शिक्षणासाठी आले. नवीन शहर, नवीन वाटा, पण ध्येय ठाम होतं.काहीतरी वेगळं करायचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. त्यांनी पदवी आणि उच्च पदवी घेतल्यानंतर संगणक आणि स्टेनोग्राफी कोर्स करत काळाच्या गरजेला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं. नोकरीसाठी सिन्नर, नाशिक, पुणे अशा ठिकाणी संधी मिळत होत्या. नामांकित कंपन्यांचे कॉल लेटर्स त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होते. पण त्यांच्या मनात वेगळीच ओढ होती....

धनंजयभाऊ खैरनार परिवर्तनाची धग...!

इमेज
धनंजयभाऊ खैरनार परिवर्तनाची धग...! आजचा दिवस एरंडोलकरांसाठी एक विशेष महत्त्व घेऊन आला आहे. कारण आज आहे धनंजयभाऊ खैरनार यांचा वाढदिवस एक असा व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या कार्याने आणि आचरणाने समाजाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. धनंजयभाऊ हे केवळ एक नाव नाही, तर ते समाजहितासाठी अविरत झटणाऱ्या चळवळीचं जिवंत प्रतीक आहेत. गांधीपुरा विकास सोसायटीचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी परिसरातील असंख्य समस्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यावर प्रभावी उपाय शोधले. त्यांच्या विचारसरणीत प्रामाणिकपणा आहे, वागणुकीत पारदर्शकता आहे, आणि कृतीत सकारात्मक आश्वासकता आहे. भावी नगरसेवक म्हणून जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा त्यांनी कुठल्याही प्रचाराशिवाय, केवळ आपल्या निस्वार्थ कामातून निर्माण केल्या आहेत. आज जिथे राजकारण हे बहुतेकदा वैयक्तिक स्वार्थाचे साधन बनले आहे, तिथे धनंजयभाऊंसारखे निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे समाजासाठीचा शुद्ध आणि स्फूर्तिदायक श्वास ठरतात. धनंजयभाऊंच्या कार्यशैलीची एक खास बाब म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता. समाजात कितीही मतभेद असले तरी ते प्...

स्वप्नांची वाट,कर्तृत्वाची साथ...!

इमेज
स्वप्नांची वाट,कर्तृत्वाची साथ...! जगात प्रत्येकजण बोलत असतो. काही लोक कौतुक करतात, काही लोक टीका करतात, तर काही जण फक्त शांतपणे हसतात. पण त्या हसण्यातही काही न बोललेले अर्थ दडलेले असतात. या सगळ्या गोंगाटात मी मात्र एक निर्णय घेतलाय.कोण काय म्हणतं, कोण काय विचार करतं याने मला काही फरक पडणार नाही. कारण माझं आयुष्य त्यांच्या शब्दांनी नव्हे, तर माझ्या प्रयत्नांनी, माझ्या कर्तृत्वाने घडतं. लोकांची मतं हवेसारखी असतात. क्षणभर वाहून येतात आणि पुढच्याच क्षणी नाहीशी होतात. पण माझं स्वप्न, ते या क्षणभंगुर गोष्टींपेक्षा खूप खोल आहे; ते माझ्या आत्म्याशी घट्ट जोडलेलं आहे. त्यांच्या नजरेत मी अपूर्ण असेन, कमी पडणारा असेन, पण माझ्या दृष्टीने मी एक प्रवासी आहे.जो स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस झगडत आहे. माझ्या प्रत्येक पावलामागे मेहनत आहे, संघर्ष आहे आणि स्वतःवरचा विश्वास आहे. लोक हसतील, "तो नाही करू शकत", "ती कशी करेल?" असे प्रश्न उभे करतील. पण त्यांना काय ठाऊक की, मी माझ्या जखमांनाही प्रेरणेचं रूप दिलं आहे. माझ्या वेदना माझ्या ताकदीचा भाग झाल्या आहेत. माझ्या अपयश...

स्वप्नं दुसऱ्यांची आयुष्य त्याचं....!

इमेज
स्वप्नं दुसऱ्यांची आयुष्य त्याचं....! पुरुष… कुटुंबाचा आधारस्तंभ. जन्मताच त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे दिले जाते. काळजावर कितीही घाव झाले, तरी त्या खांद्यांची झीज कोणीच पाहत नाही."वडील", "भाऊ", "पती", "मुलगा" या प्रत्येक भूमिकेत तो सतत देतच असतो…आपला वेळ, मेहनत, स्वप्नं आणि अनेकदा स्वतःचं आयुष्यसुद्धा. प्रत्येक पुरुषाला एक "घर" असावं असं वाटतं जिथे तो थोडा विसावेल, स्वतःसाठी श्वास घेईल, जिथे त्याच्या अस्तित्वाला किंमत असेल. पण वास्तव तसं नसतं. अनेक पुरुषांचं आयुष्य घरापासून दूरच जातं काहींनी सगळी तरुणाई परदेशात किंवा दूरच्या शहरांमध्ये गमावलेली असते. त्यांचं जगणंच झालेलं असतं फक्त: “कमवा आणि पाठवा”. बाहेर गावात दिवस-रात्र मेहनत करताना त्यांना ना वेळ मिळतो, ना चैन.कधी कधी सणाला, एखाद्या अपवादात्मक प्रसंगी, चार दिवसांची सुट्टी घेऊन घरी परतले, तरी तिथे ही निवांतपणा कुठे असतो?"मुलाचं शिक्षण", "मुलीचं लग्न", "घराचं बांधकाम", "गाडीची हप्ता", "आई-वडिलांच्या औषधांची यादी"...न...