पोस्ट्स

आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......!

इमेज
आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......! एक काळ असा होता की शिक्षक वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आदर, विश्वास आणि जिज्ञासा आपोआप दाटून यायची. शिक्षकांचे शब्द अंतिम सत्य मानले जात, त्यांचा सल्ला जीवनाला दिशा देणारा असे, आणि त्यांचे अस्तित्व समाजासाठी दीपस्तंभासारखे भासे. परंतु आज ही प्रतिमा पूर्णपणे बदललेली दिसते. आज शिक्षक वर्गात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या हातात केवळ पाठ्यपुस्तक नसते, तर मनात आदेशांची भीती, नियमांचे ओझे आणि असहाय्यतेची खोल जाणीव असते. तो आज शिक्षण देण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिकवत आहे, असेच भासते. आजचा शिक्षक व्यवस्थेच्या कडक बंधनांत अडकलेला आहे. प्रत्येक कृतीवर नियमांची छाया, प्रत्येक शब्दावर संशय, आणि प्रत्येक निर्णयामागे संभाव्य कारवाईची भीती असते. जे अध्यापन कधी साधना मानले जात होते, ते आज जोखमीचे कार्य बनले आहे.चूक करण्याची मुभा नाही, स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही, आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. “हे बोलणे नियमबाह्य ठरेल का?” हा प्रश्न शिक्षकाच्या मनात सतत घोळत असतो. या ...

सेवाभावातून शिक्षण, शिक्षणातून परिवर्तन शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा सन्मान....!

इमेज
सेवाभावातून शिक्षण, शिक्षणातून परिवर्तन शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा सन्मान....! समाज घडवताना काही व्यक्ती आणि संस्था केवळ आपले कार्य करत नाहीत, तर त्या कार्यातून भविष्य घडवण्याची प्रेरणा देतात. अशाच दूरदृष्टी, निष्ठा आणि सेवाभावाच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून ९४.३ माय एफएमतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार यंदा शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका संस्थेचा गौरव नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या एका विचारसरणीचा गौरव आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ९४.३ माय एफएमतर्फे दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (आयपीएस) यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या मनात आदर, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अल्पावधीत केलेले उल्लेखनीय शैक्षणिक ...

एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यात ‘जनहित प्रथम’चा निर्धार....!

इमेज
एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यात ‘जनहित प्रथम’चा निर्धार....! एरंडोल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आज आमदार अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण व सुसंस्कृत वातावरणात पार पडला. एरंडोलच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक वाटचालीत विश्वासाचे नवे पर्व सुरू करणारा हा सोहळा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. या पदग्रहण सोहळ्यास जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, भाजपा नेते ॲड. किशोरजी काळकर, युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक तथा गटनेते प्रा. मनोजभाऊ पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, धरणगांव बाजार समितीचे मा. सभापती शालिकभाऊ गायकवाड, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, भाजपा युवामोर्चा पदाधिकारी भैरवीताई पलांडे, खडके येथील जगदीशदादा पाटील, मा. नगरसेवक डॉ. एन. डी. पाटील, भाजपाचे एस. आर. पाटील, मा. जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, जयश्रीताई पाटील, शहरप्रमुख बबलूदादा चौधरी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका,इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजीमाजी...

एरंडोलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्रजी ठाकूर यांचे हार्दिक अभिनंदन!

इमेज
एरंडोलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्रजी ठाकूर यांचे हार्दिक अभिनंदन! आजचा दिवस एरंडोलच्या नगरपरिषदेच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी नोंद होईल असा सुवर्णदिवस आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन डॉ.नरेंद्रजी ठाकूर यांनी आज पदभार स्वीकारला.  हा दिवस केवळ त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाही, तर संपूर्ण एरंडोलच्या नागरिकांसाठी अभिमान आणि आनंदाने भरलेला क्षण आहे. जेव्हा एरंडोलच्या नागरिकांच्या मनात उज्ज्वल भविष्याची आशा जागृत झाली, तेव्हा आज त्या आशेला प्रत्यक्ष रूप प्राप्त झाले. डॉ. नरेंद्रजी ठाकूर हे केवळ नगराध्यक्ष नाहीत; ते अजातशत्रू व्यक्तिमत्व, प्रामाणिक मन आणि सर्वांसाठी समर्पित सेवाभाव यांचे प्रतिक आहेत. नगराच्या विकासासाठी जे प्रेम, ज्ञान आणि समर्पण आवश्यक आहे, ते सर्व गुण त्यांनी स्वतःतून दाखवले आहेत.  वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मिळवलेले ज्ञान नगराच्या आरोग्यसेवा, समाजकल्याण आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्यात मार्गदर्शक ठरणार आहे. अशा नेत्याचा उपस्थिती, ज्यावर नागरिकांना पूर्ण विश्वास आहे, हेच खरंच ...

आई कधी न संपणारी माया.....!

इमेज
आई कधी न संपणारी माया.....! आज माझा आईचे पाचवे पुण्यस्मरण, आई…हा शब्द उच्चारताच डोळ्यांत पाणी येतं आणि मन नकळत भरून येतं.आज माझ्या आईचे, स्व. सुंगधाबाई रतन पवार यांचे पाचवे पुण्यस्मरण. पाच वर्षे झाली तरी आई गेली आहे, हे आजही मन मान्य करायला तयार नाही. तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि हृदयात एक हळवी कळ उठते. काळ जरी पुढे सरकत असला, तरी आईची जागा मात्र आजही तशीच रिकामी आहे. आईने आयुष्यभर कुटुंबासाठी झगडत राहिली. स्वतःच्या इच्छा, सुख-दुःख बाजूला ठेवून ती शेवटपर्यंत आमच्यासाठी उभी राहिली. शांत, संयमी स्वभावाची आई कधीच कुणाचं मन दुखावणार नाही, याची ती नेहमी काळजी घ्यायची. कुणाशी कटू शब्द नाहीत, कुणावर राग नाही.फक्त माया, समजूतदारपणा आणि आपुलकी. घरातलं वातावरण तिच्या उपस्थितीने नेहमीच शांत आणि प्रेमळ असायचं. सर्वांना सोबत घेऊन चालणं ही तिची खास ओळख होती. मतभेद असले तरी नाती जपणं, तुटलेली मने जोडणं आणि घराला एकत्र ठेवणं.हे सगळं ती अगदी सहज करत असे. आईचं अस्तित्व म्हणजे घराचा खरा आधार होता. आज तिचा आवाज ऐकू येत नाही, पण तिचे संस्कार, तिची शिकवण आणि तिचं प्रेम आजही आमच्या प्र...

स्वार्थाची सोय आणि माणूसपणाची किंमत....!

इमेज
स्वार्थाची सोय आणि माणूसपणाची किंमत....! हरामखोरपणा म्हणजे एखादी चूक नव्हे, तर माणूस म्हणून स्वतःला कमी करत जाण्याची एक धोकादायक वृत्ती आहे. स्वतःच्या सोयीसाठी माणूसपण गहाण टाकण्याचं धाडस जेव्हा मनात जन्म घेतं, तेव्हा हळूहळू संवेदना बोथट होतात. मेहनत उपहासाची गोष्ट वाटू लागते आणि फसवणूक हुशारीचं लक्षण भासू लागते. इथेच माणूस स्वतःशीच प्रामाणिक राहणं थांबवतो. दुसऱ्याच्या कष्टांकडे लालसेनं पाहणं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं.यातूनच हरामखोरपणाचं मूळ तयार होतं. असा माणूस वेळेचं, शब्दाचं, कामाचं महत्त्व विसरतो. काम वेळेवर न करता तो फळ आधीच मागतो. नियम पाळणं त्याला जाचक वाटतं, पण अधिकार मात्र त्याला हवेत. शिस्त नको असते, पण सन्मान हवा असतो. आणि जेव्हा नियम मोडल्याची किंमत चुकवायची वेळ येते, तेव्हा स्वतःकडे पाहण्याऐवजी तो संपूर्ण व्यवस्थेलाच दोष देतो. या वृत्तीचा सर्वात मोठा फटका समाजाला बसतो. विश्वास हळूहळू मरतो आणि संशयाचं राज्य सुरू होतं. मेहनती, प्रामाणिक माणसं मागे पडतात, तर बेमालूम फसवणारे पुढे जातात. प्रामाणिकपणाची किंमत शून्य होते आणि “असं नसलं तर जगणंच कठीण आहे” ...

निष्ठेचं ओझं आणि संधीसाधूपणाचं सिंहासन....!

इमेज
निष्ठेचं ओझं आणि संधीसाधूपणाचं सिंहासन....! चार वेळा पक्ष बदलणारा नेता आज व्यासपीठावर बसलेला असतो. त्याच्या गळ्यात हार, चेहऱ्यावर हास्य आणि हातात माईक असतो. त्याचा भूतकाळ कुणाला आठवत नाही, कारण वर्तमानात तो “उपयुक्त” असतो. पण त्याच व्यासपीठाच्या खाली, खुर्च्या लावणारा, चटई उचलणारा, झेंडे बांधणारा एक कार्यकर्ता उभा असतो—ज्याचं आयुष्य मात्र एकाच विचारावर खर्च झालेलं असतं. हा कार्यकर्ता कधी बातम्यांत येत नाही. त्याच्यासाठी ना घोषणापत्र असतं, ना भाषणात नाव. तो फक्त आदेश पाळतो. सकाळपासून रात्रीपर्यंत पक्षासाठी धावतो. उन्हात भाजतो, पावसात भिजतो, पण मनात एकच अभिमान बाळगतो.“मी एकनिष्ठ आहे.” पण या एकनिष्ठतेची किंमत फार मोठी असते. वर्षानुवर्षे त्याला सांगितलं जातं, “तुझा नंबर येईल.” तो वाट पाहतो. पुढचं पिढी मोठं होतं, काळ बदलतो, नेते बदलतात… पण त्याचा नंबर कधीच येत नाही. कारण तो कधीच पक्ष बदलत नाही. तो कधीच सौदेबाजी करत नाही. तो फक्त निष्ठावान राहतो. आणि दुसरीकडे, जो कालपर्यंत विरोधात होता, जो विचारांवर नव्हे तर फायद्यावर विश्वास ठेवतो, तो आज पक्षात प्रवेश करतो. त्याला लगेच संधी मिळत...

एक चूक,एक गलती....!

इमेज
एक चूक,एक गलती....! फक्त दोन शब्द, पण त्यांच्या सावलीत किती तरी भावना, किती तरी रात्री जागवणारे विचार आणि किती तरी न बोललेल्या कथा दडलेल्या असतात.आयुष्याच्या प्रवासात चूक ही कुणाच्याही दारावर कधीही येऊ शकते; अवचित, अनपेक्षित, आणि थोडीशी अस्वस्थ करणारी. पण तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावीशी वाटते.एक चूक आयुष्य उध्वस्त करत नाही; तिच्याकडून न शिकणं मात्र माणसाला हळूहळू मागे ओढत नेतं. चूक जेव्हा घडते, तेव्हा त्या क्षणी ती खूपच लहान वाटते. “एवढंच झालंय”, “याचा काय परिणाम होणार?” असं स्वतःलाच आपण समजावत असतो. पण वेळ हा खूप प्रामाणिक असतो. तो कोणालाही फसवत नाही. काळ पुढे जातो आणि त्या छोट्या चुकीचे पडसाद मनाच्या खोल कप्प्यांमध्ये उमटू लागतात. कधी नात्यांमध्ये अंतर म्हणून, कधी आत्मविश्वासावर पडलेली जखम म्हणून, तर कधी शांत दिसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेल्या वेदनेच्या रूपात. चूक माणसाला तोडत नाही; ती त्याला उघडं पाडते. ती आपल्याला कमकुवत दाखवते असं नाही, तर आपल्याला खरं दाखवते. आपण स्वतःबद्दल ज्या प्रतिमा तयार केल्या असतात.“मी असं कधीच करणार नाही”, “मी मजबूत आहे”, “माझ्याकडून चूक होणार ...

एरंडोलची खरी ताकद सजग नागरिक आणि संवेदनशील नेतृत्व...!

इमेज
एरंडोलची खरी ताकद सजग नागरिक आणि संवेदनशील नेतृत्व...! एरंडोल नगरीच्या शांत आणि निवांत रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ निद्रेत होते, त्या वेळी एका सजग नागरिकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दिनांक २५/१२/२०२५, शुक्रवार रोजी मध्यरात्री,जलशुद्धीकरण केंद्रावरून पाण्याच्या टाकीकडे जाणारी मुख्य मेन रायझिंग लाईन हॉटेल कल्याणी परिसरात अचानक फुटली.  काही क्षणांतच पाण्याचा प्रचंड प्रवाह आजूबाजूच्या परिसरात, गॅरेजमध्ये, गोठ्यांमध्ये तसेच शेतांमध्ये वेगाने पसरू लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची तसेच पशुहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे, त्या क्षणी सदर पाईपलाईन नेमकी कुठून जात आहे, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती. अशा अत्यंत गंभीर व चिंताजनक परिस्थितीत श्री. दाऊद बागवान यांनी दाखवलेली समयसूचकता आणि जागरूकता खरोखरच उल्लेखनीय व प्रेरणादायी ठरली. मध्यरात्री ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणीपुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. दीपक गोसावी यांना तात्काळ माहिती दिली. त्यांच्या तत्परतेम...

पैशांपेक्षा जड असलेलं कर्ज...!

इमेज
पैशांपेक्षा जड असलेलं कर्ज...! हा शब्द ऐकायला जितका साधा वाटतो, तितकाच तो मनाला खोलवर बोचणारा असतो.माणूस जेव्हा उसणे पैसे घेतो, तेव्हा तो केवळ रक्कम स्वीकारत नाही; तो आपल्या मनावर एक अदृश्य ओझेही उचलतो. त्या क्षणी परिस्थितीवर मात केल्यासारखे वाटते, परंतु त्याच क्षणापासून शांत झोप हळूहळू दूर जाऊ लागते. डोक्यावर जबाबदारीचे सावट येते आणि प्रत्येक दिवस परतफेडीच्या विचारांनीच सुरू होतो. सकाळी उठल्यावर मनात येणारा पहिला विचार असतो “आज फोन येईल का?” मोबाईलची प्रत्येक रिंग हृदयाची धडधड वाढवते. नाव ओळखीचे असले, तरी त्या आवाजात दडपण जाणवते. देणाऱ्याला आपले पैसे हवे असतात. ते साहजिकच आहे.पण घेणाऱ्याच्या मनात अपराधीपणाची सल सतत टोचत राहते. शब्द न उच्चारताही मनात असंख्य प्रश्न उभे राहतात. उसण्या पैशातून मिळणारी मदत क्षणिक असते, पण तिची किंमत फार मोठी असते. उधारीचा घास पोट भरतो, मात्र आत्मसन्मानाला ओरखडा बसतो. स्वतःच्या कष्टातून मिळालेल्या पैशांत जी गोडी असते, ती उसण्या पैशांत नसते. कारण त्या पैशांत आपली हतबलता मिसळलेली असते. कधी कधी परिस्थितीच माणसाला या वाटेवर आणते. आजारपण, संकटे, जबाब...

आयुष्याचा नेम चुकतो तेव्हा…..!

इमेज
आयुष्याचा नेम चुकतो तेव्हा…..! चुकलेला नेम म्हणजे पराभवाची घोषणा नव्हे; तो थांबण्याचा सुस्पष्ट संकेत असतो. आयुष्य आपल्याला नम्रपणे सांगत असतं.“थोडा थांबा… श्वास घ्या…किड्डड्ड्स पुन्हाडीफ एकदा नीट पाहा.” हा थांबा अत्यंत मौल्यवान असतो. कारण याच थांब्यात माणूस स्वतःला भेटतो. सततच्या धावपळीत हरवलेला श्वास, गर्दीत विरघळलेली ओळख आणि यशाच्या मागे धावताना विसरलेल्या भावना या सगळ्यांची ओळख इथे पुन्हा होते. नेम चुकतो तेव्हा आयुष्य आपल्याला थांबवून विचार करायला शिकवतं, आणि या विचारातूनच परिवर्तनाचा अंकुर फुटतो. प्रत्येक अपयश हे आरशासारखं असतं. हा आरसा आपल्याला कमी लेखण्यासाठी नसतो, तर वास्तव दाखवण्यासाठी असतो. यश अनेकदा आपल्याला आकर्षक, निर्दोष दाखवतं; परंतु अपयश आपल्याला प्रामाणिकपणे ओळख करून देतं. कुठे आपण घाई केली, कुठे भीतीमुळे निर्णय डळमळीत झाले, कुठे अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित राहिला.हे सगळं अपयश शांतपणे समोर ठेवतं. ते आरोप करत नाही, दोष देत नाही; ते फक्त प्रश्न विचारतं. आणि हे प्रश्नच माणसाला आतून अधिक सजग, अधिक संवेदनशील बनवतात. चुकीच्या वाटेवर चालल्याचं लक्षात येणं हीच सुधारण...

घामाच्या थेंबांतून घडलेला स्वाभिमान कष्टाची भाकर...!

इमेज
घामाच्या थेंबांतून घडलेला स्वाभिमान कष्टाची भाकर...! कष्टाची भाकर म्हणजे केवळ भूक भागवणारा अन्नाचा तुकडा नाही; ती माणसाच्या आयुष्याची ओळख असते. ती माणसाच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची आणि जगण्याच्या जिद्दीची चव असते. जेव्हा घामाच्या थेंबांनी भिजलेले हात ती भाकर हातात घेतात, तेव्हा त्या भाकरीसोबत मनालाही एक वेगळीच शांती मिळते. कारण त्या एका घासामागे उभं असतं संपूर्ण आयुष्य – संघर्ष, अपयश, वेदना, आशा आणि न मोडलेली हिंमत. उपाशीपोटी मिळालेलं सोनं क्षणिक आनंद देऊ शकतं, पण ते मनात खोलवर समाधान देऊ शकत नाही. उलट कष्टाने मिळालेला साधा घास माणसाच्या अंतर्मनाला तृप्त करतो. कारण त्या घासामागे केलेली मेहनत, सहन केलेली उपेक्षा आणि झेललेले अपमान असतात. म्हणूनच कष्टाची भाकर खाल्ल्यावर पोट भरतं, पण त्याहून अधिक भरतं ते मन. कष्टाची भाकर माणसाला मेहनतीचं खरं मोल शिकवते. ती सांगते की आयुष्यात काहीही सहज मिळत नाही. प्रत्येक यशामागे घामाचा वास असतो, प्रत्येक समाधानामागे संघर्ष लपलेला असतो. ही भाकर माणसाला जमिनीशी जोडून ठेवते. कितीही मोठं यश मिळालं, कितीही उंची गाठली, तरी कष्टाची भाकर खाल्लेला ...

माझे पण दिवस येतील…..!

इमेज
माझे पण दिवस येतील…..! “माझे पण दिवस येतील” ही केवळ एक ओळ नाही, तर आयुष्याशी केलेली एक शांत पण ठाम घोषणा आहे. ही वाक्यं त्या मनातून येतात, जे आज थकलेलं असतं, जखमी असतं, पण हरलेलं नसतं. कारण ज्याच्या मनात अजूनही उद्याची आशा जिवंत आहे, तो माणूस कधीच संपलेला नसतो. आज नशिब साथ देत नसेल, परिस्थिती प्रतिकूल असेल, मार्ग खडतर असेल.तरीही मनात एक विश्वास असतो की हा काळ कायमचा नाही. कारण आयुष्य कधीही एका सरळ रेषेत चालत नाही; ते वळणं घेतं, आपली परीक्षा पाहतं आणि मगच आपल्याला पुढे नेण्याची तयारी करतं. आयुष्याचा खेळ एका दिवसात पलटत नाही, हे मान्य. पण मेहनत आणि जिद्द एका क्षणात माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. तो क्षण बाहेरून साधा दिसतो, पण त्यामागे असतात असंख्य अपयश, न संपणारे प्रयत्न, आणि स्वतःशी केलेली लाखो वेळा पुन्हा उभं राहण्याची वचनं. आज जो संघर्ष चाललाय, तो केवळ त्रास देण्यासाठी नाही, तर उद्याच्या उंच भरारीसाठी मन, मेंदू आणि आत्मा तयार करण्यासाठी आहे. आयुष्य आपल्याला मोडत नाही, तर घडवत असतं.फक्त त्या वेदना आपण समजून घ्यायला हव्या. संघर्षाच्या काळात सगळ्यात जास्त बोचणारी गोष्ट म्...

“मोठेपणाची खरी कसोटी”

इमेज
“मोठेपणाची खरी कसोटी” दुसऱ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा समजून घेणं ही खूप खोल प्रक्रिया आहे. ती फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या वागणुकीतून होत नाही, तर त्या माणसाच्या शांततेत, त्याच्या सहनशीलतेत, त्याने गिळलेल्या अपमानात आणि न बोलता सोसलेल्या वेदनांतून हळूहळू उलगडत जाते. प्रत्येक माणूस आपापल्या आयुष्याच्या लढाया लढत असतो. कुणी शब्दांनी जिंकतं, कुणी मौनाने. कुणी पुढे झेप घेतो, तर कुणी मागे राहून सगळ्यांना सांभाळतो. अशा वेळी दुसऱ्याच्या मनाचा मोठेपणा ओळखण्यासाठी स्वतःच्या अहंकाराच्या भिंती थोड्या बाजूला साराव्या लागतात. कारण जो मनाने मोठा असतो, तो कधीच स्वतःचा मोठेपणा मिरवत नाही; तो सहजतेने, शांतपणे, कुणालाही कमी न लेखता वागतो. पण समजून घेणं पुरेसं नसतं. एकदा का तो मोठेपणा उमगला, की तो मान्य करणं ही त्याहून कठीण पायरी असते. कारण मान्य करणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं, स्वतःपेक्षा कुणी तरी मोठं आहे हे कबूल करणं. इथेच माणसाची खरी परीक्षा होते. अनेकदा आपण दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक मनात करतो, पण ते ओठांवर येत नाही. मन मान्य करतं, पण अहंकार अडथळा बनून उभा राहतो. “तो माझ्यापेक्षा कसा...

नसतात काही गोष्टी आपल्या हातात...!

इमेज
नसतात काही गोष्टी आपल्या हातात...! नसतात काही गोष्टी आपल्या हातात हे वाक्य आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव्यानं उमगत जातं. लहानपणी आपण समजतो की प्रयत्न केले, मनापासून काहीतरी हवं ठरवलं, तर ते मिळायलाच हवं. पण जसजसं आयुष्य पुढे सरकतं, तसतसं कळतं की प्रयत्न हे आवश्यक असले तरी पुरेसे नसतात. काही गोष्टी घडतात, काही थांबतात, तर काही न सांगता निघून जातात. तेव्हा शिकावं लागतं त्यांना तिथंच सोडून द्यायला हळुवारपणे, स्वीकाराने, राग न धरता. मनातल्या भावनांचं चिंतन करायला आपण फार कमी वेळ देतो. रोजच्या धावपळीत, अपेक्षांच्या गर्दीत, “मला हेच व्हायला हवं” या हट्टात आपण आपल्या मनाचं ऐकणंच विसरतो. कधी थांबून स्वतःला विचारतो का मी खरंच काय अनुभवतोय? माझ्या मनात दुःख आहे की थकवा, भीती आहे की निराशा, की फक्त एक न संपणारी पोकळी? भावना दाबून टाकणं सोपं असतं, पण त्यांना समजून घेणं धैर्याचं काम असतं. आणि हे धैर्यच आपल्याला आतून मजबूत करतं. स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहास किती खोलवर रुजलेला असतो आपल्यात! कुणाला दाखवायचं असतं की आपण कमी नाही, कुणाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात, तर कधी स्वतःच्याच ...