पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....!

इमेज
दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....! आपली चूक नसताना स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःलाच देणं असतं. हे वाक्य ऐकायला सोपं वाटतं, पण जगताना त्याची जाणीव फार उशिरा होते. मन संवेदनशील असतं तेव्हा ते इतरांच्या शब्दांना, वागणुकीला जास्त खोलवर घेतं. आणि मग नकळत आपण स्वतःलाच दोषी ठरवायला लागतो. खरं तर सगळंच आपल्या हातात नसतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक नातं, प्रत्येक परिस्थिती आपल्या अपेक्षांप्रमाणे वागेलच असं नाही. हे स्वीकारणं कठीण असतं, पण हेच स्वीकारणं परिपक्वतेचं आणि शहाणपणाचं लक्षण आहे. लोक जेव्हा चुकीचं वागतात, तेव्हा त्या वागणुकीमागे आपला स्वभाव नसतो, तर त्यांच्या विचारांची मर्यादा असते. पण तरीही आपण आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारतो.“मी वेगळं वागायला हवं होतं का?” प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार धरणं मनाला हळूहळू थकवतं. आपण प्रामाणिक असतो, मनापासून वागतो, कुणाचं वाईट नको असतं.मग अशा वेळी मन शांत ठेवण्याचा हक्क आपलाच असतो. तरीही आपण तो हक्क स्वतःकडूनच हिरावून घेतो. सगळ्यांना समजावून सांगण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो. पण खरं सांगा...

न बोललेल्या शब्दांत हरवलेली नाती...!

इमेज
न बोललेल्या शब्दांत हरवलेली नाती...! नाती सहसा एका दिवसात तुटत नाहीत. ती तुटतात हळूहळू… अगदी नकळत. मोठे वाद, जोराचे भांडण किंवा कठोर शब्द हे कारण नसतात; खरी सुरुवात होते ती दुर्लक्षातून. बोलणं कमी होतं, भेटी टाळल्या जातात आणि “नंतर पाहू” म्हणत भावना मागे ढकलल्या जातात. तेव्हाच नात्याच्या मुळाशी एक सूक्ष्म तडा जातो. अहंकार त्या तड्याला वाढवतो.“मला काय फरक पडतो” हे शब्द जरी सहज निघाले, तरी ते नात्यांवर खोल ओरखडे उमटवतात. संवाद थांबतो आणि त्या शांततेत गैरसमज आपोआप जन्म घेतात. न बोललेली दुःखं, न समजलेल्या भावना आणि अपूर्ण अपेक्षा या सगळ्यांचा भार नातं हळूहळू पेलू शकत नाही. जेव्हा समजून घेण्याऐवजी जिंकण्याची हाव लागते, तेव्हा प्रेम मागे पडतं. नातं मग स्पर्धा बनतं.कोण बरोबर, कोण चूक याचा हिशोब सुरू होतो. माफी मागणं कमीपणाचं नसतं, पण अहंकार ते मान्य करू देत नाही. “मीच का वाकायचं?” या एका प्रश्नात कितीतरी नाती अडकून पडतात. एकदा मनात अंतर पडलं की ते दिसत नसतानाही सतत जाणवत राहतं. समोर बसूनही दूर वाटणं, शब्द असूनही संवाद न होणं, आणि हसण्यातही पोकळपणा जाणवणं हेच त्या अंतराचं अस्तित्व ...

हसऱ्या चेहऱ्यामागची फसवी साथ....!

इमेज
हसऱ्या चेहऱ्यामागची फसवी साथ....! आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक आपल्या सोबत चालताना दिसतात. गर्दीत आपण कधी एकटे आहोत याची जाणीवही होत नाही. पण अनुभव सांगतो. सोबत असणं आणि खरी साथ देणं यात फार मोठा फरक असतो. काही माणसं बाहेरून इतकी आपलीशी वाटतात की त्यांच्या शब्दांवर, हसण्यावर, काळजीवर सहज विश्वास बसतो. पण त्या आपुलकीच्या आड स्वार्थाची थंड गणितं सुरू असतात. त्यांचं हसणं मनापासून नसतं, ते गरजेपुरतं असतं. त्यांचे शब्द गोड असतात, कारण त्यामागे भावना नसून उद्देश लपलेला असतो. काही चेहरे मुखवटे असतात, तर काही शब्द अलगद अडकवणारे सापळे. खोटी साथ कधीच थेट दुखावत नाही. ती आधी मनात घर करते. तुमचा विश्वास जिंकते, तुमच्या भावना ओळखते, तुमच्या कमकुवत जागा शोधते. त्यांना माहीत असतं. जवळीक जितकी वाढेल तितका घाव खोल बसेल. म्हणूनच ते जास्त गोड बोलतात, जास्त काळजी दाखवतात, कारण विश्वास हा त्यांचा सर्वात मजबूत शस्त्र असतो. अशा लोकांना तुमचं यश सहन होत नाही. कारण यश तुम्हाला स्वावलंबी बनवतं. पण तुमची कमजोरी त्यांना हवी असते कारण तिथेच त्यांचा फायदा असतो. तुमच्या मनात जागा मिळवणं हा त्यांचा पहिला...

जनतेच्या हृदयात घर केलेलं नेतृत्व....!

इमेज
जनतेच्या हृदयात घर केलेलं नेतृत्व....! नेतृत्व म्हणजे केवळ पदाची उंची नाही, तर माणुसकीची खोली असते. जनतेच्या दुःखात धावून जाणं, त्यांच्या प्रश्नांना आपले मानून उत्तर शोधणं आणि कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालणं.हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण. अशा नेतृत्वाचं नाव म्हणजे मा. आबासो. पी. सी. पाटील साहेब. साहेब म्हणजे साधेपणा, स्पष्टपणा आणि संवेदनशीलता यांचं सुंदर मिश्रण. मोठं पद असून ही त्यांचं वागणं नेहमीच सर्वसामान्यांसारखं, आपुलकीनं बोलणं आणि प्रत्येकाला वेळ देणं यामुळेच ते “आपल्यातले” वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली माणुसकी अनेकांसाठी आधार बनली आहे. मा. शिक्षण व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी जि. प. जळगावमध्ये शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, शाळांच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी जे कार्य केलं आहे, ते दूरगामी परिणाम करणारे आहे. शिक्षण हेच समाजाचं भविष्य आहे, हा विचार त्यांनी कृतीतून दाखवून दिला. भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी संघटन मजबूत केलं, कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि पक्षाला जनतेशी अधिक घट्ट जोडण्य...

वागणूक कधीही खोटं बोलत नाही…..!

इमेज
वागणूक कधीही खोटं बोलत नाही…..! माणसाच्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात. काही हसरे, काही गोड बोलणारे, तर काही फारच आपुलकीने जवळ येणारे. पण या सगळ्या चेहऱ्यांच्या मागे दडलेली खरी ओळख शब्दांत नसते, ती असते वागणुकीत. कारण शब्द बोलताना माणूस सजग असतो, पण वागताना तो स्वतःला उघड करत असतो. बोलायला प्रत्येकजण गोड बोलतो. “तू माझा आहेस”, “मी नेहमी तुझ्यासोबत आहे” असे शब्द कानावर पडले की मनाला आधार मिळतो. पण शब्दांना वजन देणं जितकं सोपं असतं, तितकंच ते निभावणं कठीण असतं. वेळ आली की तीच माणसं बदललेली दिसतात. तेव्हा कळतं, की शब्द फक्त ऐकायला सुंदर होते, त्यामागे खरं मन नव्हतं. म्हणूनच फक्त बोलण्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो. खरा माणूस ओळखायचा असेल तर तो अडचणीत कसा उभा राहतो, हे पाहिलं पाहिजे. तुमच्याकडे काहीच नसताना, तुम्हाला काहीच देता येत नसताना जो तुमच्यासोबत राहतो, तोच खरा आपला असतो. गरज नसताना जो जवळ असतो, तो नातं निभावत असतो. स्वार्थी माणूस उपयोग असेपर्यंतच गोड वागतो. तो तुमच्या यशात आनंदी दिसतो, पण अपयशात दुरावतो. काम संपलं की त्याची वागणूक थंड होते. हळूहळू शब्द आणि कृती यामधला फर...

चाफलूसी करणारा माणूस…..!

इमेज
चाफलूसी करणारा माणूस…..! चाफलूसी करणारा माणूस समोर गोड बोलतो, पण त्या गोड शब्दांमध्ये माणुसकीपेक्षा स्वार्थ जास्त दडलेला असतो. त्याची भाषा मधाळ असते, वागणूक आपुलकीची वाटते, पण त्या आपुलकीला खोलवर मुळं नसतात. तो तुमचं कौतुक मनापासून करत नाही, तर स्वतःच्या फायद्याचा हिशेब मांडत असतो. म्हणूनच त्याच्या प्रत्येक वाक्यामागे एखादी अपेक्षा, एखादा हेतू शांतपणे लपलेला असतो. अशा लोकांना तुमची किंमत नसते, त्यांना फक्त तुमची गरज असते. तुम्ही उपयोगी आहात तो पर्यंत ते तुमच्या भोवती असतात, तुमचं महत्त्व वाढवतात, तुमच्या कानावर गोड शब्दांची बरसात करतात. पण ज्या दिवशी ती गरज संपते, त्या दिवशी त्यांचं बोलणं बदलतं, वागणूक बदलते आणि शेवटी ते आपोआप दूर जातात. ते निघून जातात तेव्हा फक्त एक पोकळी उरते.कारण आपल्याला कळतं की आपली साथ नव्हे, तर आपला उपयोगच महत्त्वाचा होता. चाफलूसी क्षणभर समाधान देते.मन सुखावतं, अहंकाराला थोडं बळ मिळतं. पण हे समाधान क्षणिक असतं.कारण जिथे खोट्या शब्दांचा आधार असतो, तिथे विश्वास टिकत नाही. विश्वास हा वेळ, प्रामाणिकपणा आणि कठीण प्रसंगातून तयार होतो.गोड बोलण्यातून नाही. ख...

बोललेले शब्द आणि सोडलेली साथ....!

इमेज
बोललेले शब्द आणि सोडलेली साथ....! वेळ… तो थांबत नाही. आज जे आपल्यासोबत आहे, तेच उद्या वेगळं होऊन जाईल. आजच्या क्षणांची गोडी आपण अनुभवतो, पण तोच क्षण काळाच्या ओघात बदलतो, नवे रंग घेऊन येतो. माणसं येतात, जातात; नाती बदलतात, परिस्थिती बदलते… पण काही गोष्टी आहेत ज्या काळाच्या ओघानेही धुसर होत नाहीत. तुम्ही जे बोललेले शब्द, ते क्षणभरात आले तरी मनावर घर करतात. आनंदात दिलेले हास्य, दुःखात दिलेले आधाराचे शब्द, विश्वासाने दिलेले वचन हे शब्द फक्त ऐकले जात नाहीत, ते हृदयात जिवंत राहतात. आणि ज्या वेळी रागात किंवा विसराने एखादे शब्द उडतात, ती आठवणही काळानं मिटत नाही; ती मनात खोलवर ठसा उमटवते. साथ… ती फक्त शारीरिक उपस्थिती नाही, ती माणूस आपल्या आयुष्यात किती महत्वाचा होता याची जाणीव आहे. एखाद्या अडचणीच्या क्षणी दिलेली साथ, किंवा नुसती हसत हसत दिलेली वेळ, किंवा अचानक सोडलेली साथ ही सगळी आठवण जिवंत राहते. काही साथ आपल्या जीवनातून निघून गेली तरी ती हृदयात कायम राहते, कधी दुःख देते, कधी स्मित करून जाते. कदाचित म्हणूनच म्हणतात वेळ बदलतो, पण काही गोष्टी मनात कोरल्या जातात. आजची माया, आजचे शब्द...

जवखेडे खुर्द : ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी

इमेज
जवखेडे खुर्द : ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी अंजनी नदीच्या काठावर वसलेले जवखेडे खुर्द हे गाव ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे. निसर्गरम्य परिसर, सुपीक जमीन व मुबलक पाणी यांमुळे हे गाव प्राचीन काळापासून मानवी वस्तीला अनुकूल ठरले आहे. इ.स. १६१३ मध्ये जसवंतसिंह देवडा (देवरे) यांनी जवखेडे खुर्द येथे आगमन करून मारुती गढीची उभारणी केली व गावाची अधिकृत स्थापना केली. त्यापूर्वीही विविध समाजांचे लोक या परिसरात वास्तव्यास होते; मात्र त्यांची वस्ती स्थायी स्वरूपाची नव्हती. जसवंतसिंह यांच्या आगमनानंतर गावाला संघटित स्वरूप प्राप्त झाले. जवखेडे खुर्द हे गाव जसवंतसिंह यांना वतनदारी स्वरूपात प्राप्त झालेले होते, त्यामुळे हे गाव जिल्ह्यात जमीनदारीसाठी प्रसिद्ध झाले. एक काळ असा होता की येथील एक शेतकरी तब्बल दोन हजार एकर जमिनीचा शेतसारा भरत असे, ही बाब गावाच्या समृद्धीची साक्ष देणारी होती. शैक्षणिक क्षेत्रातही या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुन्या काळात पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या समकालीन शिक्षण घेतलेले  व...

होतकरू मेहनतीचा विजय....!

इमेज
होतकरू मेहनतीचा विजय....! विशाल शिवनारायण पाटील यांना हार्दिक अभिनंदन! स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश दूर राहत नाही.हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे एकलग्न, ता. धरणगाव येथील विशाल शिवनारायण पाटील यांनी. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असताना, आपल्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर त्यांनी टेक्निशियन या पदावर निवड मिळवली आहे. हा केवळ पदोन्नतीचा टप्पा नाही, तर तो आहे अनेक वर्षांच्या कष्टांचा, संयमाचा आणि न डगमगणाऱ्या इच्छाशक्तीचा गौरव. सध्या रिंगणगाव येथे कार्यरत असलेले विशाल हे अत्यंत होतकरू व चिकाटीचे कर्मचारी म्हणून परिचित आहेत. घरची परिस्थिती बेताची होती. अडचणी होत्या, मर्यादा होत्या, पण मनात असलेली आशा आणि मेहनतीवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. “आपण करून दाखवू शकतो” हा आत्मविश्वास त्यांनी कधीही सोडला नाही. आणि आज त्यांनी ते करूनच दाखवले आहे. दिवसभर कष्टाचे काम, जबाबदाऱ्यांचा ताण आणि तरीही स्वतःला पुढे नेण्याची सततची धडपड—हा त्यांचा रोजचा संघर्ष होता. कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही, पण त्यांनी प...

गाईच्या पाच लिटरचा पैशांतून दिसलेली माणुसकी...!

इमेज
गाईच्या पाच लिटरचा पैशांतून दिसलेली माणुसकी...! आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणुसकी, इमानदारी आणि विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे, तिथे काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या वागण्यातून माणुसकी अजून जिवंत आहे याची खात्री पटते. बिलखेडे येथील सचिनभाऊ पाटील हे असेच एक प्रामाणिक, दिलदार आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व आहे. बिलखेडे परिसरातील लोकांचे दूध संकलन करून ते जळगाव येथील विकास दूध डेअरी येथे नियमितपणे पोहोचवण्याचे काम सचिनभाऊ अतिशय जबाबदारीने करतात. हे काम करताना केवळ व्यवसाय म्हणून नाही, तर प्रत्येक शेतकरी, प्रत्येक दूध उत्पादक हा आपलाच माणूस आहे या भावनेने ते काम करतात. एका साध्या पण खूप मोठा अर्थ असलेल्या घटनेने त्यांच्या इमानदारीचा खरा चेहरा समोर आला. एका दिवसाचे गाईचे पाच लिटर दूधाचे पैसे मला मिळायचे होते. कोणतीही आठवण करून न देता, कोणताही आग्रह नसताना, सचिनभाऊंनी स्वतःहून फोन पे द्वारे ते पैसे मला घरपोच पाठवले. आजच्या काळात जिथे आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठीही मागण्या कराव्या लागतात, तिथे असा प्रामाणिक माणूस भेटणे हे खरंच भाग्याचे आहे. ही केवळ पैशांची बाब नव...

शब्दांच्या तपश्चर्येला लाभलेला सन्मान....!

इमेज
शब्दांच्या तपश्चर्येला लाभलेला सन्मान....! प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा साहित्यिक सन्मान साहित्य हे केवळ शब्दांचे जाळे नसते, तर ते समाजाच्या जिवंत वेदनांचे, आशेचे आणि परिवर्तनाच्या स्वप्नांचे प्रतिबिंब असते. अशा साहित्याची निष्ठेने साधना करणाऱ्या कवीला जेव्हा सन्मानाच्या शिखरावर स्थान मिळते, तेव्हा तो क्षण फक्त वैयक्तिक आनंदाचा राहत नाही.तो संपूर्ण साहित्यविश्वासाठी गौरवाचा ठरतो. अमरावतीच्या साहित्यिक वातावरणात असा एक अभिमानाचा क्षण अवतरला आहे. अमरावती येथील अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान) यांची श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे दि. 10 व 11 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या दीर्घकाळच्या साहित्यसेवेची, मूल्यनिष्ठ विचारांची आणि परिवर्तनवादी लेखनाची पावतीच आहे. ही निवड नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या शिक्षक साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय सभेत जाहीर करण्या...

आपली शर्यत ओळखा….!

इमेज
आपली शर्यत ओळखा….! आयुष्य म्हणजे एक अखंड शर्यत आहे असं आपण नेहमी म्हणतो.पण खरी शोकांतिका इथेच सुरू .आपण शर्यत धावतो, पण ती आपली आहे की नाही हे होते. तपासायलाच थांबत नाही. प्रत्येकजण धावत आहे. म्हणून आपणही धावतो, प्रत्येकजण जिंकायचा प्रयत्न करतो म्हणून आपणही जिंकायच्या मागे लागतो. पण या सगळ्यात एक प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो.आपण कोण आहोत? आणि आपली खरी ताकद नेमकी कुठे आहे? घोडा आणि कुत्रा यांचं उदाहरण हे फार साधं वाटतं, पण त्यात आयुष्याचं खोल तत्त्व दडलेलं आहे. घोडा हा ताकदीसाठी,सौंदर्यासाठी,वेगासाठी आणि अभिमानासाठी ओळखला जातो. त्याची धाव ही केवळ स्पर्धा नसते, ती त्याच्या अस्तित्वाची घोषणा असते. पण तोच घोडा जर कुत्र्यांच्या शर्यतीत उतरला, तर तिथे त्याचं काय होईल? कदाचित तो जिंकेलही, पण तिथे त्याला घोडा म्हणून ओळख मिळेल का? नाही. तिथे तो फक्त नियमात बसणारा एक घटक ठरेल. त्याची ओळख, त्याचं वेगळेपण, त्याची अस्मिता हळूहळू पुसली जाईल. माणसाचं आयुष्यही यापेक्षा वेगळं नाही. प्रत्येक माणूस वेगळ्या क्षमतेनं, वेगळ्या स्वप्नांनी आणि वेगळ्या गतीनं जन्माला येतो. कुणी विचारांनी श्रीमंत असत...

सायबर गुन्हेगारी विरोधी कार्यशाळेचे शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आयोजन....!

इमेज
सायबर गुन्हेगारी विरोधी कार्यशाळेचे शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आयोजन....! आजचे युग हे केवळ तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचे नाही, तर सजगतेची, जबाबदारीची आणि सावधपणाची कसोटी पाहणारे युग आहे. एका छोट्याशा क्लिकने जग आपल्या हातात येते, पण त्याच क्लिक मागे दडलेला धोका अनेकदा आपल्या नजरेआड राहतो. या अदृश्य, पण गंभीर संकटाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजवण्याचे मोलाचे कार्य शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल येथे आयोजित सायबर क्राईम विषयक कार्यशाळेमुळे घडून आले. दि. ०८ जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत एरंडोल पोलीस ठाण्याचे श्री.ललित नारखेडे व श्री. दीपक राजपूत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केवळ माहितीच दिली नाही, तर आपल्या अनुभवांच्या माध्यमातून वास्तवाचे भयावह चित्र उलगडून दाखवले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे ऐकताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती, आश्चर्य आणि आत्मपरीक्षणाची भावना ही या कार्यशाळेची खरी फलश्रुती ठरली. “सायबर गुन्हे हे कुणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकतात,” ही जाणीव मनाला चटका ...

मानलेल्या नात्यांची खरी उंची....!

इमेज
मानलेल्या नात्यांची खरी उंची....! नातं फक्त रक्ताचा धागा नसतो, तर मनाच्या जोडणीचं, विश्वासाचं, आणि सोबत राहण्याचं प्रतीक असतं. आपल्याला अनेकदा वाटतं की रक्ताचे नाते म्हणजे आपुलकीची हमी, पण सत्य हे की रक्त फक्त नात्याची ओळख जोडते; त्यात प्रेम आणि समजूतदारपणा नसल्यास ते नाते फक्त नावापुरतं राहते. जेव्हा अपेक्षा तुटतात, जेव्हा जवळचे दूर जातात, तेव्हा वेदना प्रचंड वाटतात.अशावेळी मानलेली नाती आपल्यासाठी आभाळापेक्षा मोठी वाटतात. कारण ती नाती अधिकारात नाहीत,त्यात गरज आणि खरी ओळख असते. संकटात हात धरून उभं राहणं, दु:खात आपल्या बाजूला असणं हेच खरी नात्यांची कसोटी आहे. रक्त नातं जोडतो, पण विश्वास टिकवतो नातं.जे मनापासून सोबत असतात, ते आडनाव किंवा प्रतिष्ठेच्या बंधनात अडकत नाहीत; ते फक्त आधार देतात. स्वार्थ संपल्यावर रक्ताची नातीही बदलू शकतात.हे कटू सत्य आहे.  पण निस्वार्थी माणसं आपलं दुःख स्वतःचं मानतात, इतरांना त्रास देत नाहीत, फक्त हात धरतात, साथ देतात, आणि आपली माया उघड करतात.म्हणून नात्यांची मोजदाद रक्तावर नाही, तर वागणुकीवर करा. संकटात जो उभा राहतो, जो आपल्या वेदना सामायिक कर...

आपली चूक नसताना…..!

इमेज
आपली चूक नसताना…..! आपली चूक नसताना मनावर आलेलं ओझं फार वेदनादायी असतं. कारण ते ओझं आपण कमावलेलं नसतं, तरीही ते वाहावं लागतं. दुसऱ्याच्या चुकीमुळे मन दुखावलं जातं, पण शिक्षा मात्र आपण स्वतःलाच देतो. सतत स्वतःला प्रश्न विचारत राहतो. “आपणच काहीतरी चुकीचं केलं का?” या प्रश्नाचं उत्तर अनेकदा नाही असतं, तरीही मन मान्य करत नाही. सगळं आपल्या हातात नसतं, हे स्वीकारणं कठीण असतं. आपण प्रामाणिक राहिलो, मनापासून प्रयत्न केला, तरी समोरचा माणूस चुकीचं वागू शकतो. कारण लोकांचं वागणं आपल्या स्वभावावर नाही, तर त्यांच्या विचारांच्या मर्यादांवर अवलंबून असतं. कुणाची असुरक्षितता, कुणाचा अहंकार, कुणाचं अपूर्णपण याचा फटका आपल्या मनाला बसतो, आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. हेच तर सर्वात मोठं दुःख असतं. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार धरणं मनाला थकवतं. सतत स्वतःच्या चुका शोधणारा माणूस हळूहळू स्वतःवरचा विश्वास गमावतो. अपराधभावनेचं ओझं मनावर साचत जातं आणि शांतता हरवून बसते. पण आपण प्रामाणिक असू, मन स्वच्छ असेल, तर शांत राहण्याचा आपला पूर्ण हक्क असतो. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही; ते स्वतःच्या...

अपयशाच्या सावलीत उमललेली आशा....!

इमेज
अपयशाच्या सावलीत उमललेली आशा....! अपयश… एक असा शब्द, जो ऐकतानाच मन थोडंसं खचतं. डोळ्यांसमोर तुटलेली स्वप्नं, अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा आणि स्वतःवरच आलेला राग उभा राहतो. पण खरं सांगायचं झालं, तर ह्याच अपयशाच्या राखेतून संघर्षाची ज्वाला पेटते. कारण ज्याने कधी हरायचं दुःख अनुभवलंय, त्यालाच जिंकण्याची खरी किंमत कळते. अपयश आपल्याला थांबवत नाही; ते आपल्याला थोडं मागे खेचतं, स्वतःकडे पाहायला लावतं. “नेमकं कुठे चुकलो?” हा प्रश्न विचारायला भाग पाडतं. आणि हाच प्रश्न पुढील प्रवासाची दिशा ठरवतो. यश सहज मिळालं, तर त्याची नशा असते; पण संघर्षातून मिळालेलं यश आत्म्याला भिडतं. कारण त्या यशामागे अश्रूंचे थेंब, झोप न लागलेल्या रात्री आणि स्वतःशी केलेली शांत लढाई दडलेली असते. ज्याच्या पाठीशी अपयशाची कथा असते, त्याची लेखणी अधिक प्रामाणिक होते. शब्दांमध्ये अनुभवाचा भार असतो. प्रत्येक ओळीत वेदनेची आठवण असते, पण त्याचबरोबर आशेची ठिणगीही असते. अशा माणसाला माहीत असतं.आजचा अंधार कायमचा नसतो. कारण तो आधीही कोसळलाय आणि पुन्हा उभाही राहिलाय. संघर्षाची गाथा लिहिताना तो स्वतःलाच धीर देतो. “मी अपयशी ठरलो ह...

विश्वासाचं फळ....!

इमेज
विश्वासाचं फळ....! विश्वास म्हणजे नुसता शब्द नाही, तो मनाचा एक नाजूक धागा असतो. हा धागा आपण कोणाच्या तरी हातात देतो तेव्हा त्यामागे अपेक्षा नसते,तर एक शांत विश्वास असतो.की समोरची व्यक्ती आपली भावना जपेल. शंका न करता दिलेला विश्वास हा सहज दिला जात नाही; तो मनाच्या खोल पातळीवरून येतो. आणि म्हणूनच तो आपली परीक्षा घेतो. ही परीक्षा कठोर असते, पण अन्यायकारक कधीच नसते. कारण तिचा निकाल दोनच मार्गांनी समोर येतो. कधी आयुष्यभरासाठी सोबत करणारी,मन ओळखणारी, आपल्याला आपलंसं मानणारी एक चांगली व्यक्ती भेटते. आणि कधी असा अनुभव मिळतो, जो मनाला दुखावतो, डोळ्यांत पाणी आणतो, पण आयुष्यभरासाठी एक अमूल्य धडा देऊन जातो. विश्वास ठेवणं ही कमजोरी नाही; ती धाडसाची, प्रामाणिकपणाची आणि माणुसकीची खूण आहे. फसवणूक झाली म्हणून विश्वास चुकीचा ठरत नाही. उलट, त्या क्षणी समोरच्याच व्यक्तीचा खरा चेहरा दिसून येतो. आपण कोणावर विश्वास ठेवला, यासाठी स्वतःला दोष देणं म्हणजे आपल्या निर्मळ मनालाच शिक्षा देणं ठरतं. चांगली व्यक्ती मिळाली तर आयुष्य समृद्ध होतं. नात्यांना अर्थ मिळतो, मनाला आधार मिळतो, आणि जग थोडं अधिक आपुलक...

उधार यशाची व्याजासकट परतफेड....!

इमेज
उधार यशाची व्याजासकट परतफेड....! नियती कुणालाच सोडत नाही मित्रा…हे वाक्य ऐकायला कठोर वाटतं, पण आयुष्याच्या प्रवासात त्याचं सत्य हळूहळू उलगडत जातं. कारण नियती आरडाओरडा करत नाही, ती शांतपणे पाहत राहते.माणसाची वागणूक, त्याचे शब्द, आणि त्याने दिलेल्या जखमा. काही लोक नाती विसरतात, भावना पायदळी तुडवतात, विश्वास घातालाच शहाणपण समजतात. क्षणभर ते यशस्वी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या आयुष्याचा झगमगाट लोकांना भुरळ घालतो. पण ते हसू खोलवर पोहोचत नाही. कारण ते बाहेरचं असतं… आत मात्र अस्वस्थतेचा कोलाहल सुरू असतो. आयुष्याचा हिशोब लगेच होत नाही. तो वेळ घेतो. कारण वेळच खरी न्यायाधीश असते.निःपक्षपाती, न चुकणारी. आज ज्या भावना दुर्लक्षित केल्या जातात, त्याच उद्या जखम बनून उभ्या राहतात. आज ज्या शब्दांना किंमत दिली जात नाही, तेच उद्या आठवणींमध्ये टोचत राहतात. माणूस ज्या वर्तनाने जगतो, त्याच वर्तनाची सावली त्याच्या मागे चालत असते. ती सावली कधी उजेडात दिसत नाही, पण अंधारात ती अधिक ठळक होते. कुणाचं मन दुखावून पुढे गेलेला माणूस किती ही पुढे गेला, किती ही मोठा झाला, तरी आतून तो कधीच पू...

शब्दांविना बोलणारी माणुसकी.....!

इमेज
शब्दांविना बोलणारी माणुसकी.....! या जगात असे अनेक जीव आहेत, ज्यांना शब्दांची देणगी मिळालेली नाही; पण त्यांचे दुःख, वेदना आणि प्रेम मात्र बोलके असते. हीच आहेत मूक दया ज्या आवाजाविना आपल्याला माणुसकीची जाणीव करून देतात. माणूस आपल्या वेदना शब्दांत मांडू शकतो, मदतीसाठी हाक मारू शकतो. पण मूक जीवांना ते शक्य नसते. भुकेने व्याकुळ झालेले पिल्लू, अपघातात जखमी झालेला प्राणी, पावसात कुडकुडणारा पक्षी हे सर्व आपल्याकडे मदतीची याचना करत असतात, पण न बोलता. त्यांच्या डोळ्यांत प्रश्न असतो.“माझे ही या जगात स्थान नाही का?” मूक दयांवर होणारी क्रूरता मन सुन्न करणारी आहे. त्यांना मारहाण करणे, हाकलून देणे, जखमी अवस्थेत सोडून देणे.हे सगळे आपण पाहतो, पण अनेकदा दुर्लक्ष करतो. त्यांची वेदना न बोलता सहन करण्याची ताकद आपल्याला आरसा दाखवते. आपण स्वतःला सुजाण म्हणवतो, पण मूक दयांकडे पाहताना आपल्या संवेदना कुठे हरवतात? मूक दयांचे प्रेम अतिशय निर्मळ असते. ते स्वार्थ ओळखत नाही, फसवणूक जाणत नाही. तुम्ही दिलेल्या एका क्षणाच्या मायेवर ते आयुष्यभर विश्वास ठेवतात. त्यांच्या नजरेतला आधार, शेपटी हलवणार...

उत्तरे प्रत्येकाकडे असतात.....!

इमेज
उत्तरे प्रत्येकाकडे असतात.....! उत्तरे ही प्रत्येकाकडे असतात, पण ती नेहमी शब्दांत मांडली जातीलच असं नाही. काही उत्तरं आवाजात नसतात, ती माणसाच्या जगण्यात उतरलेली असतात. म्हणूनच काही लोक गप्प असतात.कमतरतेमुळे नाही, तर परिपक्वतेमुळे. शांत माणूस अनेकदा गैरसमजाचा बळी ठरतो. त्याच्या शांततेला दुर्बलता समजली जाते, त्याच्या मौनाला अपुरेपणाचं लेबल लावलं जातं. पण खरं पाहिलं तर शांतता ही कमकुवतांची ढाल नसते; ती स्वतःची दिशा ठाऊक असणाऱ्यांची ओळख असते. ज्यांना आपण कुठे उभे आहोत हे माहीत असतं, त्यांना प्रत्येक वळणावर घोषणा करावी लागत नाही. प्रत्येक वादाला उत्तर देणं ही बुद्धिमत्ता नसते. कधी कधी ते आतल्या असुरक्षिततेचं द्योतक असतं. स्वतःवर विश्वास असेल, तर प्रत्येक प्रश्नाला लगेच प्रत्युत्तर द्यावंसं वाटत नाही. काही वेळा मौन हेच सर्वात ठोस उत्तर ठरतं. कारण शब्द जिंकवू शकतात, पण मूल्येच माणसाला उभं ठेवतात. जे तत्वांवर जगतात त्यांना सतत स्पष्टीकरण देण्याची घाई नसते. त्यांना माहीत असतं.वेळच सर्वात प्रामाणिक साक्षीदार आहे. आज न समजलेली भूमिका उद्या आपोआप स्पष्ट होते. आज दुर्लक्षित झालेली शांतत...

स्वतःचा निर्णय…..!

इमेज
स्वतःचा निर्णय…..! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सल्ले देणारे अनेकजण भेटतात.कोणी आपुलकीने,कोणी अनुभवाच्या जोरावर, तर कोणी केवळ बोलण्यापुरते. सल्ला देणं खूप सोपं असतं, कारण त्या मागे जबाबदारी नसते. पण जेव्हा त्या सल्ल्याचे परिणाम भोगायची वेळ येते, तेव्हा मात्र सगळेच मागे हटतात. कारण त्या निर्णयाचं ओझं,त्या चुकांची वेदना आणि त्या यशाचं वजन शेवटी आपल्यालाच वाहावं लागतं. प्रत्येक माणूस आपापल्या अनुभवाच्या चष्म्यातूनच आपल्याला जग दाखवत असतो. त्याचा अनुभव चुकीचा नसतो, पण तो आपला अनुभव ही नसतो. आपली परिस्थिती, आपली वेदना, आपली स्वप्नं आणि आपली मर्यादा हे सगळं वेगळं असतं. म्हणूनच कोणाला ही पूर्णपणे आपली जागा घेता येत नाही. आपण काय सहन करतोय, काय गमावतोय किंवा काय मिळवू शकतोय हे खरं तर आपल्यालाच माहीत असतं. निर्णय घेताना चूक होण्याची भीती सगळ्यांनाच वाटते. पण चूक न करता शिकलेला धडा फार काळ टिकत नाही. चुकून शिकलेला धडा मात्र आयुष्यभर साथ देतो. धाडसा शिवाय यश मिळत नाही, आणि अपयशा शिवाय अनुभव येत नाही. जे कधीच धोका घेत नाहीत,ते कधीच स्वतःला ओळखू शकत नाहीत. लोक आज सल्ला देतील, उद...

अहंकारात हरवलेली माणुसकी....!

इमेज
अहंकारात हरवलेली माणुसकी....! कपटी माणसाचा मार्ग सुरुवातीपासूनच घाणेरडा असतो. तो चालतो तेव्हा पायाखालची मातीच नव्हे, तर आजूबाजूची नातीही मळकट होतात. बाहेरून हसरा, गोड बोलणारा, पण आतून स्वार्थाच्या विळख्यात अडकलेला असा हा माणूस सत्याशी कधीच प्रामाणिक नसतो. त्याच्या प्रत्येक पावलामागे एखादा डाव, एखादी लपलेली अपेक्षा असते. विश्वास त्याच्यासाठी साधन असतो, मूल्य नव्हे. अहंकाराच्या आंधळेपणात त्याला स्वतःची चूक कधीच दिसत नाही. कारण चूक पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा मन स्वच्छ असावं लागतं. “मीच योग्य” या गर्वाच्या कवचात तो इतका गुरफटतो की समोर उभं असलेलं सत्य ही त्याला धूसर दिसतं. कोणी आरसा दाखवला तर तो आरसा फोडतो; पण चेहऱ्यावरची मळ पुसण्याचा विचार करत नाही. सल्ला त्याला अपमान वाटतो, आणि सुधारणा त्याला कमजोरी वाटते. कपटी माणूस इतरांसाठी खड्डे खोदताना थकत नाही. कधी शब्दांनी, कधी डावपेचांनी, तर कधी खोट्या कथा रचून तो इतरांना अडचणीत आणतो. त्याला वाटतं आपण फार हुशार आहोत, आपली खेळी कुणालाच कळणार नाही. पण काळ हा सर्वांत मोठा साक्षीदार असतो. तो शांतपणे पाहत राहतो आणि योग्य क्षणी सत्य उघडं करत...

नियतीचा अटळ हिशोब......!

इमेज
नियतीचा अटळ हिशोब......! नियती कुणालाच वाचवत नाही.हे वाक्य ऐकायला जरी कठोर वाटत असलं, तरी आयुष्याच्या प्रवासात त्याची सत्यता वारंवार सिद्ध होत जाते. माणूस कितीही हुशार असो, कितीही यशस्वी दिसत असो, पण कर्माच्या पलीकडे जाण्याची ताकद कुणातच नाही. कारण नियती पाहत असते.शांतपणे, संयमाने आणि अचूकपणे. आयुष्यात काही लोक पुढे जाताना नाती मागे सोडतात. भावना ओझं वाटू लागतात, विश्वास अडथळा वाटतो. अशा वेळी ते यशस्वी झाल्यासारखे भासतात. चेहऱ्यावरचं बनावटी हसू, समाजात मिळणारी प्रतिष्ठा आणि वरवरचं सुख पाहून अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण हे सगळं फक्त बाह्य आवरण असतं. आतमध्ये मात्र आत्मा अस्वस्थ असतो, कारण ज्याने कुणाचं मन दुखावलं आहे तो माणूस स्वतःशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही. आयुष्याचा हिशोब लगेच मांडला जात नाही. कारण वेळ हीच खरी न्यायाधीश आहे. ती कुणाच्या बाजूने उभी राहत नाही, तर सत्याच्या बाजूने उभी राहते. आज ज्या भावना दुर्लक्षित केल्या जातात, त्याच भावना उद्या जखम बनून उभ्या राहतात. आज पायदळी तुडवलेला विश्वास उद्या प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं कारणांनी देता येत ...

मनातली जागा…...!

इमेज
मनातली जागा…...! मनातली जागा ही माणसाच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान जागा असते. ती दिसत नाही, मोजता येत नाही, पण तिचं अस्तित्व प्रत्येक श्वासात जाणवतं. पैसा माणसाला घर देऊ शकतो, गाडी देऊ शकतो, मोठं पद आणि नाव देऊ शकतो; पण कुणाच्या मनातली जागा मात्र विकत घेता येत नाही.ती मिळते फक्त माणुसकीतून, प्रामाणिकपणातून आणि निखळ भावनांतून. एखाद्याच्या मनात घर बांधायचं असेल तर भिंती शब्दांच्या नसतात, तर त्या विश्वासाच्या असतात. छप्पर दिखाव्याचं नसतं, तर आपुलकीचं असतं. तिथे वावरण्यासाठी श्रीमंती लागत नाही; लागतं ते फक्त “आपलं” असणं. दोन प्रेमळ शब्द, वेळेवर दिलेली साथ, अडचणीत धरलेला हात एवढंच पुरेसं असतं मनात खोलवर उतरायला. आजच्या धावपळीच्या जगात सगळेच काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत आहेत. पैसा, प्रतिष्ठा, यश यांची यादी संपतच नाही. पण या सगळ्या गर्दीत एक गोष्ट मात्र नकळत मागे पडते भावना. आणि गंमत अशी की आयुष्याच्या शेवटी जे उरतं, ते हेच भावनिक ऋणानुबंध असतात.लोक तुमचं काय बोलणं विसरतील, तुम्ही काय दिलं तेही विसरतील, पण तुम्ही त्यांना कसं वाटू दिलं, ही जाणीव मात्र आयुष्यभर सोबत राहते. दिखाव...

ओठांवर हसू, पोटात काळजी जपायचे कोण....?

इमेज
ओठांवर हसू, पोटात काळजी जपायचे कोण....? नवीन वर्ष… नव्या आशा, नव्या स्वप्नांची चाहूल घेऊन येतं. पण या नव्या सुरुवातीला एक शांत, पण महत्त्वाचा संकल्प करायला हवा स्वतःच्या मनाच्या सुरक्षिततेचा. जग अनुभवातून शिकतं, फसवणुकीतून शहाणं होतं. पण आपण मात्र विश्वास ठेवत ठेवत अनेकदा स्वतःलाच दुखावत राहतो. कारण आपल्याला वाटतं.आपल्या आजूबाजूची सगळी माणसं आपलीच आहेत. पण सत्य तितकंसं सोपं नसतं. इतिहास साक्षी आहे.घात हा नेहमी शत्रूकडून नाही, तर जवळच्या माणसाकडूनच होतो. जिथे डोळे मिटून विश्वास ठेवला जातो, तिथेच विश्वासघाताची शक्यता सर्वाधिक असते. काही लोकांचे शब्द गोड असतात, पण हेतू कडू. ओठांवर हसू असतं, पण पोटात मात्र वेगळंच काही शिजत असतं. समोर पाठ थोपटणारी हीच माणसं मागे तुमच्याच पायाखाली खड्डे खोदत असतात. त्यांच्या “आपुलकी”त स्वार्थाची धार लपलेली असते, आणि त्यांच्या “सल्ल्या”त तुमच्या अपयशाची चाहूल असते. आपण चुकतो तेव्हा, जेव्हा वारंवार दुखावलं जाऊनही “कदाचित यावेळी नाही” असं म्हणून पुन्हा विश्वास ठेवतो. मनाचं हृदय फार मोठं असणं ही कमजोरी नाही; पण सगळ्यांसाठी दार उघडं ठेवणं ही नक्कीच चू...

गरज संपली की माणसं बदलतात…..!

इमेज
गरज संपली की माणसं बदलतात…..! “गरज संपली की माणसं बदलतात” हे वाक्य आपण ऐकलेलं असतं; पण जोपर्यंत आयुष्य स्वतः ते शिकवत नाही, तोपर्यंत त्यामागची खोल वेदना उमगत नाही. अनुभवाच्या वाटेवर चालताना कळतं की हे शब्द केवळ वाक्य नसून, वास्तवाचं एक बोचणारं सत्य आहे. आणि जेव्हा हे सत्य आपल्याच जवळच्या माणसांकडून समोर येतं, तेव्हा वेदना अधिक तीव्र होतात, कारण अपेक्षांची मुळे तिथेच खोलवर रुजलेली असतात. उपयोग असे पर्यंत मायेची भाषा, हक्काची वागणूक आणि आपुलकीची उब लाभते. मात्र गरज संपताच तेच नाते थंड होतं, आणि अंतर नकळत वाढू लागतं. कोणी थेट दुखावत नाही, शब्दांनी जखम करत नाही; पण दुर्लक्षाची शांतता असंख्य वेदना बोलून दाखवते. तेव्हा जाणवतं की माणसं बदलली नाहीत, तर वेळेने त्यांच्या खऱ्या स्वभावावरचा पडदा दूर केला आहे. नात्यांची किंमत केवळ गरजेनुसार ठरवणारी माणसं कधीच आपली नसतात. ती आपल्या आयुष्यातील एखाद्या टप्प्यापुरतीच सोबत असतात. विश्वास तुटतो तेव्हा कुठला ही आवाज होत नाही.ना रडणं,ना ओरडणं. मात्र मनाच्या आत काहीतरी कोसळतं; एक आधार, एक आपुलकी, एक भ्रम.त्या तुटलेल्या विश्वासाच्या अवशेषांतून स्...

शिक्षण, सत्य आणि समाजसेवेचे आदर्श व्यक्तिमत्त्व...!

इमेज
शिक्षण, सत्य आणि समाजसेवेचे आदर्श व्यक्तिमत्त्व...! आदरणीय श्री. मंगल बी. पाटील सर सेवानिवृत्त प्राचार्य, क्राइम बुलेट न्यूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वीर गुर्जर सेनेचे कर्तव्यनिष्ठ सचिव हे नाव समाजात केवळ ओळखीपुरते मर्यादित नसून, ते प्रेरणा, नेतृत्व आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनले आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या मंगलमय क्षणी मन भरून येते. कारण आपण आयुष्यभर ज्या निष्ठेने शिक्षण, पत्रकारिता आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रांत कार्य केले, त्याने असंख्य जीवनांना दिशा दिली. प्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार, शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचे महान कार्य आपण केले. अनेक विद्यार्थी आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्यामागे आपल्या मार्गदर्शनाची छाया आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात क्राइम बुलेट न्यूजच्या माध्यमातून आपण सत्य, निर्भयता आणि प्रामाणिकपणाचा आवाज बनलात. समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहताना, दुर्बलांच्या बाजूने ठामपणे बोलताना आपण कधीही आपली मूल्ये सोडली नाहीत. हीच नितळ भूमिका आपल्याला लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवून देते. वीर गुर्जर सेनेच्य...

अपमानाच्या सावलीत गमावलेलं स्वतःपण....!

इमेज
अपमानाच्या सावलीत गमावलेलं स्वतःपण....! जिथे मान राखला जात नाही, तिथे थांबणं म्हणजे हळूहळू स्वतःला मिटवत जाणं असतं. सुरुवातीला ते फक्त शब्द असतात, कधी दुर्लक्ष, कधी उपहास, कधी शांतपणे केलेला अपमान. पण काळ जसजसा पुढे सरकतो, तसं ते शब्द मनावर ओरखडे काढू लागतात. माणूस हसत राहतो, वागत राहतो; पण आत कुठेतरी तो रोज थोडासा तुटत असतो. आदर मागून मिळत नाही. तो कुणाच्या कृपेनं दिले जाणारे दान नाही.आदर हा वागण्यातून उमटतो. डोळ्यांतल्या सन्मानातून, शब्दांच्या सौम्यतेतून, आणि ऐकून घेण्याच्या तयारीतून. जिथे शब्दांपेक्षा आवाज मोठा असतो, तिथे मन कायम दबलेलं राहतं. तिथे स्वतःचं मत मांडताना धडधड वाढते, चूक नसताना ही अपराधी वाटू लागतं. अपमान जर सवय बनली, तर आत्मसन्मान नकळत गळून पडतो. सुरुवातीला आपण स्वतःलाच समजावतो “चालतंय”, “त्यांचा स्वभावच असा आहे”, “मीच adjust करतो”. पण adjust करत करत एक दिवस लक्षात येतं की आपण स्वतःपासूनच दूर गेलो आहोत. नातं असो, कामाची जागा असो किंवा मैत्री मान नसेल, तर ते नातं आधार न राहता ओझं बनतं. सहनशीलता ही मोठी गुणवैशिष्ट्य आहे; पण स्वतःला गमावणं ही त्याची किंमत असू ...

संघर्ष, सेवा आणि नेतृत्वाची नवी ओळख प्रदीपभाऊ गुजर...!

इमेज
संघर्ष, सेवा आणि नेतृत्वाची नवी ओळख प्रदीपभाऊ गुजर...! भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका पश्चिम विभाग ओबीसी आघाडी तालुकाध्यक्षपदी श्री. प्रदीपभाऊ गुजर यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! समाजकारणात काही व्यक्ती अशा असतात की ज्या केवळ पदासाठी नव्हे, तर लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी काम करतात. त्यांच्या कार्यातून विश्वास निर्माण होतो, त्यांच्या शब्दांत आपुलकी असते आणि त्यांच्या कृतीत समाजासाठीची निष्ठा दिसून येते. अशाच कर्तृत्ववान आणि संवेदनशील नेतृत्वाचा गौरव म्हणजे श्री. प्रदीपभाऊ गुजर यांची भारतीय जनता पार्टीच्या जामनेर तालुका पश्चिम विभाग ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी झालेली निवड होय. ही निवड केवळ एका पदाची नाही, तर त्यांच्या प्रामाणिक कार्याची, संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाची पोचपावती आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी नातं जपणारे, प्रत्येकाच्या अडचणी आपल्यासारख्या समजून घेणारे आणि नेहमी सकारात्मक मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणून प्रदीपभाऊंची ओळख आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी, न्यायासाठी आणि सन्मान...

संघर्षातून घडलेले कर्तृत्व शिक्षक आदरणीय श्री. बुधाकर देवलाल गुजर...!

इमेज
संघर्षातून घडलेले कर्तृत्व शिक्षक आदरणीय श्री. बुधाकर देवलाल गुजर...! आजचा दिवस हा केवळ एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा नसून, संघर्षातून घडलेल्या यशाचा, कर्तृत्वाचा, संस्कारांचा आणि समाजासाठी अर्पण केलेल्या आयुष्याचा गौरव करणारा दिवस आहे. आदरणीय श्री. बुधाकर (सर) देवलाल गुजर यांनी आपल्या आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा केला आहे. या मंगलप्रसंगी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन व कोटी कोटी शुभेच्छा! जांभोरे येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या जिद्दी व्यक्तिमत्त्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि शिक्षणावरील निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी शिक्षक म्हणून समाजात आपला ठसा उमटवला. माध्यमिक शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी केवळ धडे शिकवले नाहीत,तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, संस्कार आणि स्वप्ने रोवली. निवृत्तीनंतर शांत बसणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. समाजासाठी काहीतरी देण्याची तळमळ त्यांच्या मनात कायम होती. याच भावनेतून त्यांनी धानोरा गावात स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. ग्रामीण भा...

अस्तित्वाची जाणीव जगण्याची सुरुवात....!

इमेज
अस्तित्वाची जाणीव जगण्याची सुरुवात....! आयुष्य प्रत्येकालाच मिळतं, पण स्वतःचं अस्तित्व ओळखून ते ठामपणे जगणं हे फार थोड्यांना जमतं. जगात वावरत असताना आपण आहोत, हे केवळ आपल्याला माहीत असणं पुरेसं नसतं; तर आपण कोण आहोत, हे जगाला कळणंही तितकंच गरजेचं असतं. कारण आयुष्यात स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही, ही वास्तवाची कडू पण खरी बाजू आहे. बर्‍याचदा आपण आयुष्याला दोष देतो.परिस्थिती अशी होती, वेळ योग्य नव्हता, नशिबातच नव्हतं. पण खरं तर आयुष्य आपल्याला संधी देत असतं; निर्णय घ्यायचं धैर्य मात्र आपणच गमावतो. आयुष्याचे सगळेच निर्णय जर आयुष्यावर सोडून दिले, तर माणूस फक्त श्वास घेत राहतो… पण मनापासून जगत नाही. कारण निर्णय न घेणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची सूत्रं कुण्या दुसऱ्याच्या हातात देणं. स्वतःसाठी उभं राहणं सोपं नसतं. चुका होतील, अपयश येईल, लोक टीका करतील. पण त्या सगळ्यातूनच माणूस घडत असतो. जो पडूनही उभा राहतो, जो स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने जगायला शिकतो. जगात आवाज त्याचाच ऐकला जातो, जो आधी स्वतःच्या मनाचा आवाज ...